Mysterious Temples : देशातील काही रहस्यमयी मंदिरं; ज्याठिकाणी घडतात अनेक अविश्वसनीय घटना

Mysterious Temples : सनातन धर्म हा सर्वात प्राचीन धर्म मानला जातो. सनातन हिंदू धर्मात त्रिदेवांना मान्यता आहे. भारत आपल्या प्राचीन मंदिरांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या देशामध्ये असंख्य छोटी-मोठी मंदिरं असून त्यांची संस्कृती, श्रद्धा किंवा कर्तृत्वासाठी ओळखली जातात. परंपरा, श्रद्धा आणि रहस्यमय कारणांसाठी अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत. पाहूयात ही मंदिरं कोणती आहेत. 

Mar 14, 2023, 22:11 PM IST
1/5

कोडुंगल्लूर भगवती मंदिर, केरळ

कोडुंगल्लूर भगवती मंदिर, केरळ

केरळच्या कोडुंगल्लूर भगवती मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. कोडुंगल्लूर भगवती मंदिराचं रहस्य म्हणजे, याठिकाणी केली जाणारी पूजा किंवा विधी देवीच्या सूचनेनुसारच केली जातात.

2/5

वीरभद्र मंदिर, आंध्र प्रदेश

वीरभद्र मंदिर, आंध्र प्रदेश

हे मंदिर देखील देशातील रहस्यमयी मंदिरांपैकी एक मानलं जातं. वीरभद्र मंदिरातील रहस्यमयी मंदिर म्हणजे, याठिकाणी 70 मोठे स्तंभापैकी एक स्तंभ हा छाताला स्पर्श करतो, मात्र  या स्तंभाचा स्पर्श जमिनीला होत नाही. याला हँगिग पीलर असं म्हटलं जातं.

3/5

करणी माता मंदिर, राजस्थान

करणी माता मंदिर, राजस्थान

करणी माता मंदिर हे भारतातील बिकानेरमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात 20,000 हून अधिक उंदीर आहेत आणि उंदरांचे अन्न अत्यंत पवित्र मानलं जातं. 

4/5

कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी

कामाख्या देवी मंदिर गुवाहाटी

गुवाहाटीच्या एका टेकडीवर असलेलं कामाख्या देवीचं मंदिर माँ दुर्गेच्या 51 शक्तीपीठांमध्ये येतं. दरवर्षी पावसाळ्यात मंदिर 3 दिवस बंद असतं. गर्भगृहातून वाहणारा झरा त्या दिवसात लाल होतो, असं मानलं जातं. 

5/5

असिरेश्वर मंदिर, मध्य प्रदेश

असिरेश्वर मंदिर, मध्य प्रदेश

महाराष्ट्र तसंच मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर वसलेल्या बुऱ्हानपूर जिल्ह्यातील असिरगडावर शिवमंदिर आहे. पौराणिक कथांप्रमाणे, महाभारतातील अश्वत्थामाकडून वडिलांच्या मृत्यूचा बदला घेत असताना एक चूक झाली आणि त्याला भगवान कृष्णाने शाप दिला. अश्वत्थामा गेल्या 5 हजार वर्षांपासून भटकतोय, असं म्हणतात. किल्ल्यामध्ये असलेल्या शिवमंदिरात अश्वत्थामा पूजेसाठी येतो, असं मानलं जातं.