'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

| Nov 17, 2018, 12:40 PM IST
1/8

2/8

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

फॅण्ड्री, सैराट अशा सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीत नवे इतिहास रचणारा दिग्दर्शक नागराज मंजुळेचा 'नाळ' सिनेमाही सर्व रेकॉर्ड तोडण्यास सज्ज झालायं. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांचा नाळ सिनेमा अखेर प्रदर्शित झालाय. शुक्रवारी अगदी झुंडीनं प्रेक्षक 'नाळ' पाहायला चित्रपटगृहांकडे वळले, आणि या नव्या सिनेमाशी प्रेक्षकांची 'नाळ' पुन्हा एकदा जुळली गेली.  प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या सिनेमाचं कौतुक केलंय. आम्ही तुम्हाला सहा कारण सांगणारा आहोत ज्यासाठी तरी तुम्ही सिनेमा नक्का पाहायला हवा.

3/8

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक असा प्रवास करणारा सुधाकर रेड्डी 'नाळ' सिनेमातून  दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतोय. फॅण्ड्री सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळेची यामध्ये प्रमुख भुमिका आहे. यासोबतच देविका दफ्तरदार, दीप्ती देवी देखील नागराज सोबत दिसताहेत. यांचा अभिनय पाहण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहायला हवा.

4/8

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळतेय. आठ वर्षाच्या मुलाचं खोडकर तितकंच संवेदनशील जग यातून दिसतंय. आई आणि बाळाचं गोड नात त्याला 'जाऊ दे नवं' गाण्याचा साज हे आपण ज्यांनी ट्रेलरमध्ये पाहिलंय त्यांना तरी सिनेमा पाहण्याचा मोह आवरणार नाही. 

5/8

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

दिग्दर्शक नागराज मंजुळेने मराठी सिनेसृष्टीत नवा पायंडा रचलाय. 100 कोटींचा गल्ला आणि त्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे जणू नागराजच्या सिनेमाचं समीकरणचं असावं. फॅण्ड्री आणि सैराट प्रमाणे 'नाळ' ची कथाही वेगळ्या धाटणीची असणार हा प्रेक्षकांना विश्वास आहे. 

6/8

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

नाळ सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुधाकर रेड्डीने सिनेमॅट्रोग्राफर म्हणून 'मीर्च' (2010), 'देऊळ' (2011), 'नौटंकी साला' (2013), 'हायवे : एक सेल्फी आरपार' ( 2015) आणि 'सैराट' (2016) यामध्ये काम केलंय. सिनेमॅटोग्राफी नंतर पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात आलेल्या सुधाकर रेड्डीने इमोशन, प्रेमळ सिन्स कसे हाताळले हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

7/8

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

सारेगामापातून आपल्या गाण्याची मोहिनी सर्वांवर टाकणाऱ्या जय कुमारच्या आवाजाची जादू 'नाळ'मध्येही पाहायला मिळणार आहे. 'नाळ'मध्ये असलेलं एकमेव 'जाऊ दे नवं' हे गाणं जय कुमारने गायलंय. या गाण्यातील शब्द आणि संगीत एवी प्रफुलचंद्र यांचे असून रुग्वेद कुलकर्णी आणि रुचा कुलकर्णी यांचा आवाजही या गाण्यात ऐकायला मिळणार आहे. 

8/8

'नाळ' सिनेमा का पाहावा ? याची सहा कारणं

नागराज आपल्या प्रत्येक सिनेमातून एक नवा चेहरा आणतो आणि हा चेहराच चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनतो. मग तो जब्या बनलेला सोमनाथ अवघडे, परश्या असलेला आकाश ठोसर, आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू अशी अनेक नाव सांगता येतील. या सर्वात आता श्रीनिवास पोकळे नावाची भर पडली आहे.