Navratri 2nd Day : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं दुसरं नातं : बहिणी -बहिणी

Navratri 2nd Day : नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा असतो. नवरात्रीचं दुसरं नातं हे बहिणी बहिणीचं... 

Oct 16, 2023, 15:43 PM IST

Navratri 2nd Day : नवरात्रीच्या नऊ दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस देवाच्या एका रुपाची पूजा केली जाते. तर वारानुसार रंग परिधान केला जातो. 

1/7

नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जाते. हातात कमंडलु आणि जपमाळ घेतलेली, पांढर फिक वस्त्र नेसलेली अशी ही ब्रह्मचारिणी देवी... 

2/7

शुद्धता, सात्विकता, शांतता, सरळ स्वभाव, वृत्तीतला ठेहेराव हे सगळं ब्रह्मचारिणी देवीला शोभून दिसत. आणि हे सारं दाखवण्याची, व्यक्त करण्याची क्षमता असते ती पांढऱ्या रंगात..

3/7

ब्रह्मचारीणी देवी हे पार्वतीचे रूप... पार्वती आणि गंगा हिमालयाच्या दोन्ही कन्या. या सख्ख्या बहिणी ..म्हणून आजच नातं हे बहिणींच..

4/7

पूर्वीच्या काळी मोठया - लहान बहिणीची जोडी प्रत्येक घरात असायची. दोघींचे कपडे सारखे वेण्या अगदी तशाच.. एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं, जसं   

5/7

अक्काची ग चोळी| येते माझ्या अंगा|आम्ही दोघी बहिणी| एका वेलीच्या ग दोन शेंगा||

6/7

पौर्णिमेच्या दिवशी भूमीवर येणाऱ्या चंद्र किरणांच्या धवलधारा पाहिल्या की बहिणींचं आणि पांढऱ्या रंगाचं नातं उलगडतं.

7/7

 नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेच्या ब्रह्मचारीणी रूपाला मनःपूर्वक वंदन ॥