'ऑलिम्पिक स्पर्धा भारतात झाली तर...', गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला '2036 मध्ये आपण...'

Neeraj Chopra On Olympics 2036 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिलं रौप्यपदक पटाकवलं अन् भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा एकदा रोवला. अशातच विजयानंतर नीरजने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Saurabh Talekar | Aug 10, 2024, 10:37 PM IST
twitter
1/5

नीरज चोप्रा

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक पदक जिंकून खूप आनंद झाला. पण मी सर्वांची माफी मागू इच्छितो, असं म्हणत नीरजने कारण देखील सांगितलं.

twitter
2/5

राष्ट्रगीत

पॅरिसमध्ये आमचे राष्ट्रगीत वाजवता आले नाही, परंतु त्या क्षणासाठी आणखी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन नीरज चोप्राने देशवासियांना दिलं आहे.   

twitter
3/5

ऑलिम्पिक 2036

2036 मध्ये भारताने जर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं असेल तर खूप चांगलं होईल. भारतीयांना ऑलिम्पिक स्पर्धा लाईव्ह पाहण्याची संधी मिळेल, असं नीरज चोप्रा म्हणाला.

twitter
4/5

भारतीय क्रिडाप्रेमी

भारतीय क्रिडाप्रेमींसाठी आणि खेळासाठी ही महत्त्वाची गोष्ट असेल. भारतीय लोक लवकर उठतात आणि खेळ पाहण्यासाठी उशिरापर्यंत जागतात, असं म्हण त्याने आभार मानलेत.

twitter
5/5

मी प्रयत्न करेल

भारतात आता खेळाच्या सवयी आणि इतर खेळाबद्दल प्रेम वाढत आहे, याचं हे उदाहरण आहे, असंही नीरज चोप्रा याने म्हटलं आहे. आगामी स्पर्धांसाठी आणि भारतीय तिरंग्यासाठी मी प्रयत्न करेल, असंही नीरज याने यावेळी म्हटलं आहे.   

twitter