NMACC च्या भव्य उद्घाटन सोहळ्यात निता अंबानी यांचा सुंदर डान्स; वेधलं सर्वांचंच लक्ष

NMACC Opening Ceremony: 'निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचा (Neeta Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या उद्धाटन सोहळ्यासाठी फक्त भारत नव्हे तर विदेशातूनही पाहुणे उपस्थित होते. दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यात निता अंबानी यांच्या नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.   

Apr 01, 2023, 20:07 PM IST

1/6

मुंबईत निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनात रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन निता अंबानी यांनी  'रघुपती राघव राजा राम' गाण्यावर नृत्य केलं. यावेळी इतर कलाकारांनीही त्यांना सोबत दिली.   

2/6

31 मार्च रोजी या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. NMACC मिळणारा पाठिंबा पाहून आपण आश्चर्यचकित आहोत. हे जगातील सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. येथे सर्व कला आणि कलाकारांचं स्वागत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.   

3/6

या कार्यक्रमासाठी मुकेश अंबानी, इशा अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चंट, आकाश अंबानी असं संपूर्ण कुटुंबच उपस्थित होतं.   

4/6

दरम्यान उद्घाटनासाठी राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह उपस्थित होते. यासह सलमान खान, शाहरुख खान, आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर असे अनेक दिग्गज उपस्थित होते.   

5/6

मुंबईतील बीकेसीमध्ये असणाऱ्या जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये हे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आलं आहे. यामध्ये ३ प्रदर्शन कला केंद्रं आहेत.   

6/6

या सांस्कृतिक केंद्रात अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये डायमंड बॉक्स, स्टुडिओ थिएटर, आर्ट हाऊस अशा अनेक गोष्टी आहेत. दर्शकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी हे सांस्कृतिक केंद्र खास पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे.