Suryakumar Yadav: ना बॅटिंग जमेना ना फिल्डिंग; सूर्यकुमारला झालंय तरी काय?

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात (DC vs MI) मुंबईकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवला खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये (IPL 2023) परतावं लागलं. तर त्याने कॅच देखील सोडलेत.

Apr 12, 2023, 00:17 AM IST

Suryakumar Yadav: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात (DC vs MI) मुंबईकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवला खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये (IPL 2023) परतावं लागलं. तर त्याने कॅच देखील सोडलेत.

1/5

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव सध्या फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून येतंय. गेल्या 6 सामन्यात सूर्या 4 वेळा शुन्यावर आऊट झाला आहे. त्यामुळे सूर्याला नेमकं काय झालंय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

2/5

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीदरम्यान सूर्यकुमार यादवच्या डोळ्याला दुखापत झाली. एक सोप्पा कॅच सूर्याने सोडला.

3/5

सूर्यकुमार अक्षर पटेलकडून आलेला कॅच घेण्यासाठी गेला. पण त्याच्या डोळ्यात बॉल लागल्याने काही वेळ त्याच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या येत होत्या. 

4/5

अत्यंत वाईट वेदना होत असल्याचं दिसून आलं आणि फिजिओथेरपिस्टनं तात्काळ धाव घेत त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्यावेळी तो मैदानातून निघून गेला. मात्र, सोप्पा कॅच सोडल्याने त्याच्यावर टीका देखील होत आहे.

5/5

दरम्यान, एकीकडे बॅट चलत नसताना सूर्या फिल्डिंगमध्ये वारंवार चुका देखील करताना दिसतोय. गेल्या 2 सामन्यात त्याने 3 कॅच सोडले आहेत. त्यामुळे आता ना बॅट जमेना ना फिल्डिंग, असं म्हणण्याची वेळ आल्याचं दिसतंय.