ना विराट ना रोहित, जेम्स अँडरसन टीम इंडियाच्या 'या' फलंदाजाला घाबरायचा!

James Anderson On Sachin Tendulkar : इंग्लंडचा वेगवाग गोलंदाज जेम्स अँडरसन याने क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी पान जोडलं अन् टेस्ट क्रिकेटच्या एका अभूतपूर्वी करियरचा शेवट केला.

Jul 12, 2024, 20:16 PM IST
1/5

जेम्स अँडरसन

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये 40 हजार चेंडू टाकणारा जेम्स अँडरसन जगातील पहिला वेगवान आणि चौथा गोलंदाज ठरला.

2/5

टीम इंडियाचा फलंदाज

मात्र, तुम्हाला माहितीये का? जेम्स अँडरसनला टीम इंडियाच्या एका महान फलंदाजाला बॉलिंग करण्याची प्रचंड आवड होती.

3/5

सचिन तेंडूलकर

तुम्हाला विराट कोहली किंवा रोहित शर्मा वाटला असेल. पण हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून सचिन तेंडूलकर आहे. अँडरसन सचिनचा मोठा चाहता आहे.

4/5

खराब चेंडू

सचिन एकदा मैदानात फलंदाजीला आला की मी फक्त इतकाच विचार करायचो मी त्याला एकही खराब चेंडू टाकू शकत नाही, असं जिम्मी म्हणतो.

5/5

सचिनची विकेट

भारतासाठी इतका महत्त्वाचा होता की त्याला बाद केल्यानंतर भारतातील मैदानावरील चित्र बदलून जायचं. सचिनची विकेट खूप मोठी असायची, असंही जेम्स अँडरसनने म्हटलं आहे.