कधी काळी करोडोंचा मालक, आता Vinod Kambli चा पगार ऐकून धक्का बसेल

Former Indian Cricketer Vinod Kambli Viral Video : टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओत विनोद कांबळीच प्रकृती ढासळलेली दिसत आहे. त्याला आपल्यावरही उभं रहाता येत नाहीए.

| Aug 07, 2024, 17:24 PM IST
1/9

कधी काळी करोडोंचा मालक, आता Vinod Kambli चा पगार ऐकून धक्का बसेल

2/9

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या आपल्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. विनोद कांबळीचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत त्याला नीट चालताही येत नाही. काही लोकं त्याला धरुन घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  

3/9

प्रकृतीबरोबरच विनोद कांबळीची आर्थिक परिस्थिती प्रचंड ढासळलेली आहे. कधी काळी करोडो रुपयांचं मालक असलेल्या विनोद कांबळीचं आताचं उत्पन्न ऐकून चाहते हैराण झाले आहेत. 

4/9

मीडिया रिपोर्टनुसार कधी काळी एका सामन्यासाठी लाखो रुपये कमाई करणारा विनोद कांबळी सध्या केवळ बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर जगतोय.  

5/9

बीसीसीआयकडून विनोद कांबळीला दर महिना 30,000 रुपये पेन्शन म्हणून मानधन मिळतंय. इतक्याच पैशात त्याला उदरनिर्वाह करावा लागतोय. मिळालेल्या माहितीनुसार विनोद कांबळीचं वर्षाचं उत्पन्न केवळ 4 लाख रुपये इतकंच आहे. 

6/9

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विनोद कांबळी कॉमेंट्री आणि जाहीरातीतून चांगली कमाई करत होता. 2022 च्या एका रिपोर्टनुसार त्याची नेटवर्थ 1.5 मिलिअन डॉलर इतकी होती. 

7/9

क्रिकेटशिवाय विनोद कांबळीने बॉलिवूडमध्येही काम केलंय. 'अनर्थ' आणि 'पल पल दिल के पास' या चित्रपटात त्याने छोटीसी भूमिका साकारली होती. तसंच एका दाक्षिणात्य चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही झळकला होता.

8/9

विनोद कांबळीने 2019 मध्ये एका संघाच्या प्रशिक्षकाचंही काम केलं होतं. टी20 मुंबई लीगशी हा संघ जोडला गेला होता. पण त्यानंतर कोरोना महामारीच्या काळात विनोद कांबळीकडे कोणतंच काम नव्हतं. त्यामुळे त्याच्या कमाईचे मार्गही बंद झाले. 

9/9

विनोदी कांबळी गेल्या काही काळापासून आजारपणाला तोंड देतोय. 2013 मध्ये त्याला ह्दयविकाराचा झटकाही आला होता. यानंतर त्याची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती.