New Electricity Rules: वीज कनेक्शन गेलं तर मिळेल भरपाई

Jan 04, 2021, 15:12 PM IST
1/7

वीज कनेक्शन देणं-घेणं झालं सोपं

वीज कनेक्शन देणं-घेणं झालं सोपं

नवे कनेक्शन घेणं आणि सध्याचे कनेक्शन बदलण्याचे नियम पारदर्शी, सोपे आणि वेळेत पूर्ण होतील. यासाठी ऑनलाईन अर्ज देखील केला जाऊ शकतो.  

2/7

विना मीटर कनेक्शन नाही

विना मीटर कनेक्शन नाही

नव्या नियमांनुसार विना मीटर कोणासही कनेक्शन दिले जाणार नाही. नवे मीटर स्मार्ट प्री-पेमेंट मीटर किंवा प्री पेमेंट असणं गरजेचं आहे.  

3/7

बील आणि टॅरिफमध्ये पारदर्शकता

बील आणि टॅरिफमध्ये पारदर्शकता

नव्या नियमांनुसार वीज बील आणि टॅरिफमध्ये पारदर्शकता येणार आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाई  बील भरता येईल. किंवा बील पेमेंटचा पर्याय देखील देण्यात आलाय.  

4/7

24X7 वीज पुरवठा करावा लागणार

24X7 वीज पुरवठा करावा लागणार

वीज वितरण कंपन्यांना (DISCOMS) सर्व ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करावा लागणार आहे. राज्य शासन काही ठिकाणी ठराविक तास ठरवू शकते. 

5/7

खराब सेवा दिल्यास ग्राहकांना मिळेल भरपाई

खराब सेवा दिल्यास ग्राहकांना मिळेल भरपाई

वीज कंपन्या (DISCOM) वीज सप्लाय देण्यास अयशस्वी झा्यास ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल.   

6/7

अशा परिस्थितीत मिळेल भरपाई

अशा परिस्थितीत मिळेल भरपाई

काही परिस्थितीत वीज कंपन्यांकडून ग्राहकांना सहा हजार प्रति दिन ते 1 लाखापर्यंत भरपाई मिळू शकते. 1)मर्यादित वेळेत कंपन्यांनी ग्राहकांना वीज सप्लाय केला नाही तर.. 2)सप्लाय करण्यात अडथळा येत असेल तर 3) कनेक्शन घेणे, हटवणे, कनेक्शन पुन्हा लावणे आणि शिफ्टिंगमध्ये वेळ लागला तर.. 4)बिल, वोल्टेज, मीटर संदर्भात तक्रारी निवारणास वेळ लागला तर..

7/7

ठराविक वेळात होणार तक्रारीचे निवारण

ठराविक वेळात होणार तक्रारीचे निवारण

ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर निवारणाची वेळ मर्यादा वीज कंपन्यांना ठरवावी लागणार आहे. नव्या नियमानुसार 45 दिवसात तक्रारींचे निवारण करणे गरजेचे आहे.