Vastu Tips: नववर्ष 2023 मध्ये करा हे उपाय, देवी लक्ष्मीची होईल कृपा

New Year 2023: जगातील सर्व सुख आपल्याला प्राप्त व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते. या इच्छा पूर्ण करण्याचे काही प्रभावी मार्ग वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईमध्ये काही तोडगे देण्यात आले आहेत. नवीन वर्षात शुभ गोष्टी तुमच्या घरी आणल्या तर फायदा होईल. 

Dec 27, 2022, 17:39 PM IST
1/5

Vastu Tips

2023 च्या पहिल्या दिवशी किंवा त्यापूर्वी फेंगशुई कासव तुमच्या घरी आणा. फेंगशुई कासव सुख, समृद्धी आणि नशीब साथ मिळवण्यासाठी खूप शुभ मानले जाते. हा कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

2/5

Vastu Tips

सनातन धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात स्वस्तिक हे चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. पूजेपासून सर्व शुभ कार्यात स्वस्तिक चिन्हाचा वापर केला जातो. घराच्या मुख्य दरवाजावर चांदीचं स्वस्तिक गंगाजलाने पवित्र करून त्याची पूजा करुन लावा. रोज रोळी लावून त्याची पूजा करावी. यामुळे घरात माता लक्ष्मीचा वास सदैव राहील.

3/5

Vastu Tips

नवीन वर्षात गणपतीची मूर्ती घरी आणा. घराच्या मुख्य दारावर गणेशाची 2 चित्रे किंवा मूर्ती अशा प्रकारे ठेवा की त्यांची पाठ एकमेकांना असेल. असे केल्याने घरातील सर्व वास्तू दोष संपून घरात सकारात्मकता, सुख-समृद्धी नांदते.

4/5

Vastu Tips

नवीन वर्षापासून दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा. असे केल्याने मां लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. या उपायाने देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो.

5/5

Vastu Tips

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाका. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता येते. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)