विराटनंतर मित्राने दिली गुड न्यूज; लग्नाआधीच झाला तीन मुलांचा बाप

न्युझीलंडचा क्रिकेटर केन विल्यमन्सनच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. केन तिसऱ्यांदा बाबा झाला असून त्याने त्याच्या  मुलीचे फोटो सोशलमिडियावर व्हायरल होत आहे.   

Feb 28, 2024, 17:14 PM IST

 

 

1/7

न्युझीलंडचा क्रिकेटर केन विल्यमन्सन आणि सारा यांना कन्यारत्न झालं असून  केन हा तिसऱ्यांदा बाबा झाला. या जगात तुझं स्वागत आहे, असं कॅप्शन देत  त्याने मुलीसोबतचे फोटो सोशलमिडियावर शेअर केले आहे.   

2/7

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर केन सुट्टीवर असल्याने तो टी20 मालिकेत ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.   

3/7

सद्या केन त्याच्या कुटुंबासोबत छान वेळ घालवतवण्याकरीता सुट्टीवर आहे, मात्र 29 फेब्रुवारीपासून होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी सामन्यात तो पु्न्हा दमदार कमबॅक करणार असल्याने म्हटलं जात आहे.  

4/7

केनची मोठी मुलगी तीन वर्षाची तर दुसरा मुलगा वर्षाचा आहे. केन आणि साराच्या  तिसऱ्या अपत्यासोबतचे फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

5/7

केन आणि सारा हे पाच वर्ष रीलेशनशिपमध्ये आहेत. सारा आणि केन लग्नापूर्वीच तीन मुलांचे आई वडील आहेत.  केन त्याच्या मुलांसोबचे फोटो व्हिडीओ सोशलमिडियावर पोस्ट करत असतो.   

6/7

केन त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीकरीता ओळखला जातो. त्याशिवाय तो त्याच्या फिटनेसबद्दलही कायम जागृक असतो. 

7/7

याशिवाय टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहलीला दुसरं अपत्य झालं असून त्याच्या मुलाचं अयाक हे नाव सद्या चर्चेचा विषय ठरत आहे.