'निसर्ग' चक्रीवादळ...

Jun 03, 2020, 19:04 PM IST
1/6

मुंबईसह पालघर, अलिबाग, कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला. मुंबईसह कोकण किनारपट्टीलगत अनेक भागांमध्ये वादळी वारे वाहू लागले. (फोटो सौजन्य : दीपक भातुसे, मढ, भाटी, कोळीवाडा)

2/6

मात्र मुंबईच्या किनाऱ्यांवर हे वादळ धडकण्यापूर्वीच त्याचा प्रवास हा शहरापासून ५० किलोमीटर दक्षिणेच्या दिशेने सुरु झाला. परिणामी शहरावरील निसर्गचं सावट काहीसं कमी झालं. (फोटो सौजन्य : मेघा कुचिक, पालघर)

3/6

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईपासून हे वादळ काहीसं दूर गेलं असलं तरीही पालघर, नाशिक, पुणे, उत्तर महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्येही त्याचे परिणाम दिसणार आहे. (फोटो सौजन्य : दीपक भातुसे, मढ, भाटी, कोळीवाडा)  

4/6

नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : दीपक भातुसे, मढ, भाटी, कोळीवाडा)

5/6

मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी वादळासाठी प्रशासन सज्ज असून जवळपास एनडीआरएफच्या टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य : मेघा कुचिक, पालघर)

6/6

या वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून किनारपट्टीजवळील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. वादळामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला  आहे. (फोटो सौजन्य : देवेंद्र कोल्हटकर, अलिबाग)