हजारो नोकऱ्या उपलब्ध करुन देणारे बडे प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर का गेले? श्वेतपत्रिकेत सरकारचा मोठा खुलासा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अखेर उद्योग विभागाची श्वेतपत्रिका विधानपरिषदेत मांडली. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याबाबत महाविकास आघाडीवरच अप्रत्यक्षरित्या ठपका ठेवण्यात आला आहे. राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर सामंतांनी श्वेतपत्रिकार काढण्याची घोषणा केली होती. 

Aug 03, 2023, 23:19 PM IST

White Paper On Vedanta Foxconn: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अखेर उद्योग विभागाची श्वेतपत्रिका विधानपरिषदेत मांडली. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याबाबत महाविकास आघाडीवरच अप्रत्यक्षरित्या ठपका ठेवण्यात आला आहे. राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर सामंतांनी श्वेतपत्रिकार काढण्याची घोषणा केली होती. 

1/5

फॉक्सकॉन, एअरबस, सॅफरन आणि बीडीपी या प्रकल्पांबाबत या श्वेतपत्रिकेत भाष्य करण्यात आले आहे. 

2/5

अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या आरोपानंतर उद्योग मंत्र्यांनी ही श्वेतपत्रिका मांडली आहे. 

3/5

हा अहवाल महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता, की राज्याला एक नाकर्ता मुख्यमंत्री आणि माहितीशून्य उद्योगमंत्री आहे हे सिद्ध करण्यासाठीच प्रकाशित केला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. 

4/5

 खोके सरकारच्या नाकर्तेपणाची ही श्वेतपत्रिका आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी श्वेतपत्रिकेवरून सरकारवर निशाणा साधला. 

5/5

तत्कालीन मंत्रिमंडळाने कोणतंही प्रोत्साहन किंवा जमिनीबाबत प्रस्ताव दिला नाही असं कंपनीने म्हटल्याचं असं या श्वेतपत्रिकेत नमूद केलंय.