Ashadhi Ekadashi 2024: रात्री साबुदाणा भिजवायला विसरलात तरी हरकत नाही; अशी बनला मऊ साबुदाण्याची खिचडी

आषाढी एकादशी निमित्त तुम्ही देखील उपवास ठेवला असेल. उपवास कोणताही असो साबुदाणा खिचडी ही हमखास अनेकांच्या घरी बनते. 

| Jul 16, 2024, 21:53 PM IST
1/7

उपवासात साबुदाणा खिचडी, वरीचा भात तसंच फळं खाल्ली जातात. साबुदाण्याची खिचडी लुसलुशीत आणि मऊ होण्यासाठी साबुदाणा तासन्तास पाण्यात भिजवावा लागतो. यासाठी आदल्या रात्रीच साबुदाना भिजू घातला जातो. 

2/7

पण जर तुम्ही साबुदाणा भिजवलाय विसारला असाल तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अगदी सह साबुदाणा खिचडी बनवू शकता.

3/7

साहित्य- साबुदाणा - 1 कप, उकडलेले बटाटे बारीक चिरून - 1 वाटी, भाजलेले शेंगदाणे - 1/4 कप, बारीक चिरलेले आले - 1 टीस्पून, हिरव्या मिरच्या - 3-4, जिरे - 1/2 टीस्पून, चिरलेली कोथिंबीर - 2 टिस्पून, काळी मिरी - 1/4 टीस्पून, लिंबाचा रस - 1 टिस्पून, देसी तूप - 2 चमचे, मीठ - चवीनुसार

4/7

साबुदाणा न भिजवता खिचडी बनवायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा साबुदाणा स्वच्छ करून घ्या आणि दोन-तीन वेळा पाण्याने धुवावे लागतील. आता एका भांड्यात पाणी घ्या आणि गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर साबुदाणा त्यात घाला. साबुदाणा 5 मिनिटांत मऊ होणार आहे. 

5/7

यानंतर आता एका पॅनमध्ये तूप/तेल गरम करा. थोड्या वेळाने जिरे, आले आणि हिरवी मिरची घालून परतवा. चिरलेला बटाटा घाला आणि मसाल्यामध्ये चांगला मिसळा.

6/7

बटाटे 2 मिनिटे तळल्यानंतर त्यात साबुदाणा घालून मिक्स करा. यानंतर तो चांगला शिजू द्या. यावेळी गरज असल्यास खिचडीमध्ये थोडे पाणी घाला, जेणेकरून साबुदाणा चांगला मऊ होईल. 

7/7

यानंतर त्यात शेंगदाणे, मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. 2 मिनिटांनी गॅस बंद करा. तुमची मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी तयार आहे.