न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितलं, वजन कमी करण्याचं Secret, पुन्हा वजन वाढणारच नाही

Rujuta Diwekar Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धत माहित असणे अत्यंत गरजेचे असते. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने शेअर केलं वजन कमी करण्याचं खास सिक्रेट.

| Mar 09, 2024, 07:47 AM IST

वजन कमी केल्यावर ते तेवढ्याच दुपटीने वाढतं? हा एकाच व्यक्तीचा नाही तर अनेकांचा प्रश्न असतो. जितकं वजन कमी करावं तितकंच ते वाढतं, अशावेळी काय करावं? काहीच कळत नाही? वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं? या सगळ्या प्रश्नांवर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने शेअर केलं खास सिक्रेट. वजन कमी करताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. चांगल्या सवयी उत्तम आरोग्य आणि वजन कमी होते. यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. याबाबत ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास गोष्टी.

1/8

चांगल्या सवयी

Rujuta Diwekar Weight Loss Tips

आनंदाचा मार्ग हा पोटातून जातो. अशावेळी तुमचा आहार उत्तम असणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी चांगल्या सवयी अतिशय महत्त्वाच्या असतात. याच चांगल्या सवयी तुमचं वजन कमी करायला मदत करतात. या सवयी कोणत्या ते समजून घेऊया. 

2/8

आहार कसा असावा?

Rujuta Diwekar Weight Loss Tips

आहार करताना ते तुमच्या स्वयंपाक घरातील असावं याकडे विशेष लक्ष द्या. तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात मिळणारं अतिशय पारंपरिक आणि लोकलं असं फूड खा.  स्वयंपाक घरातील पदार्थ खाण्याकडे भर द्या. प्रोसेस फूड खाऊ नका. एवढंच नव्हे तर जेवताना एका जागेवर आणि एका वेळेत बसा. जेवताना संपूर्ण शरीरातून कृतज्ञता व्यक्त करा. 

3/8

व्यायाम

Rujuta Diwekar Weight Loss Tips

ऋजुता दिवेकर सांगते की, वजन कमी करण्यासाठी आहारासोबतच व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. अशावेळी दररोज 30 मिनिटे आणि आठवड्यातून 150 मिनिटे व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचं आहे. 

4/8

कमी बसा

Rujuta Diwekar Weight Loss Tips

आपल्यापैकी अनेकांच काम हे बसून करण्याचं आहे. अशावेळी दर 30 मिनिटांनी उठा. यानंतर 3 मिनिटं चाला किंवा उभे राहा. पण सतत अनेक तास बसणे टाळा. 

5/8

झोप महत्त्वाची

Rujuta Diwekar Weight Loss Tips

झोप ही तुमच्या अनेक गोष्टींवर उपाय आहे. अशावेळी चांगली झोप अतिशय महत्त्वाची आहे. रात्री लवकर झोपा कारण तुमची झोप पूर्ण झाली असेल तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं. लवकर म्हातारे व्हायचं नसेल तर लवकर झोपण्याची सवय लावा   

6/8

स्क्रिनपासून दूर राहा-छंद जोपासा

Rujuta Diwekar Weight Loss Tips

हल्ली घरातील प्रत्येकजण मोबाइल असो किंवा इतर गॅजेट्समध्ये अडकून राहिल्याचे दिसते. अशावेळी तुमचा कल हा छंद जोपासण्याकडे अधिक ठेवा. कारण यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. 

7/8

यामुळे काय होणार

Rujuta Diwekar Weight Loss Tips

वरील सर्व गोष्टी योग्य पद्धतीने फॉलो केल्यास शरीराच्या कोणत्या समस्या दूर होणार आहेत, हे सजमून घेणं देखील गरजेचं आहे. यामुळे तुमच्या शरीरात हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती जास्त होणार आहे. एवढंच नव्हे तर ब्लोटिंग, ऍसिडिटीची समस्या दूर होईल. वजन कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहिल. चालणे किंवा व्यायाम असल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहिल. 

8/8

वजन कमी झाल्यावर

Rujuta Diwekar Weight Loss Tips

दरवर्षी 10 टक्के वजन कमी करत असाल तर तुम्ही योग्य पद्धतीने वजन कमी करत असल्याचे चिन्हं आहे. वजन कमी करताना तुमच्या सवयी सुधारा. वजन कमी करणे म्हणजे फक्त बारिक होणे असे नाही तर या दरम्यान तुमची त्वचा, केस यांचा पोत देखील सुधारेल. तसेच वजन कमी झाले तरीही थकवा येणार नाही आणि सांधे मजबूत राहतील.