close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जबरदस्त स्कूटर, दहा किमीसाठी फक्त १ रुपया खर्च?

पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे लोकांचा किफायतशीर दुचाकी आणि इलेक्ट्रिक गाड्यांकडे अधिक लक्ष देताना दिसत आहेत. सरकारकडूनही वाढते प्रदूषण लक्षात घेता, इलेक्ट्रिक वाहनांवर जोर देण्यात येत आहे.

Sep 14, 2019, 08:52 AM IST
1/6

जपानमधील दुचाकी वाहन निर्माता कंपनी ओकिनावा (okinawa) टू-व्हिलर्सने काही दिवसांपूर्वी 'प्रेज प्रो' (Praise Pro) स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर बाजारात आधीपासून असलेल्या 'प्रेज'चं (Praise) अपग्रेडेड व्हर्जन असल्याचं बोललं जात आहे.

2/6

'प्रेज' ओकिनावाची हायस्पीड स्कूटर आहे. या स्कूटरची दिल्लीमध्ये एक्स शोरुम किंमत ६५ हजार ४३० रुपये इतकी आहे. ओकिनावाच्या या 'प्रेज'मध्ये १ हजार वॅटची दमदार मोटर आहे. संपूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर एका वेळेत १७५ ते २०० किमी धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ताशी ७५ किमी वेगाने ही स्कूटर धावू शकते.

3/6

स्कूटरच्या लॉन्चिंग वेळी कंपनीने दावा केला की, स्कूटर १ किमी चालवण्याचा खर्च केवळ १० पैसे इतका आहे. म्हणजेच जर तुम्ही या स्कूटरने १० किमीचा प्रवास केला तर याचा खर्च केवळ १ रुपये इतका येईल. स्टायलिश लूक असलेल्या या स्कूटरच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक लावण्यात आला आहे.

4/6

स्कूटरमध्ये इकोनॉमी, स्पोर्टी आणि टर्बो असे तीन मोड देण्यात आले आहेत. इकोनॉमीमध्ये स्कूटर ३० ते ३५ किमी ताशी, स्पोर्टीमध्ये ६० किमी ताशी आणि टर्बोमध्ये ७५ किमी ताशी धावू शकते. सर्वाधिक मायलेज इकोनॉमी मोडमध्ये मिळतो. एका यूजरने दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर संपूर्ण चार्ज असताना २०० किमीहून अधिक अंतर कापले आहे.

5/6

ओकिनावा प्रेजमध्ये डिटेचेबल बॅटरी लावण्यात आली आहे. म्हणेजच या बॅटरीला कुठेही चार्ज करता येऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. १२ इंची व्हिलसह 'प्रेज'च्या पुढच्या भागात ट्विन डिस्क ब्रेक्स आहेत. तसंच रियरमध्येही सिंगल डिस्क ब्रेक लावण्यात आला आहे.

6/6

रात्रीच्या वेळी काळोखात रस्त्यांवर कोणतीही समस्या येऊ नये यासाठी, स्कूटरमध्ये डे टाइम रनिंग लाइट एलईडी हेडलॅम्प देण्यात आलाय. त्याशिवाय साइट स्टँड सेन्सर, फाइन्ड माय स्कूटर फंक्शन आणि एन्टी थेफ्ट मॅकेनिजमही देण्यात आलं आहे.