टॉप स्पीड 90 KM, ड्रायव्हिंग रेंज 151 KM आणि... Ola ने एकाचवेळी लाँच केल्या 5 जबरदस्त EV स्कूटर

काही दिवसांपूर्वीच कंपनीने  इलेक्ट्रीक स्कूटरची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने एकाचवेळी 5 स्कूटर लाँच केल्या आहेत. या सर्व स्कूटर बजेट फ्रेंडली आहेत. 

Aug 15, 2023, 16:17 PM IST

Ola electric scooter : ऑनलाईन कॅब बुकींगसाठी प्रसिद्ध असलेल्या ओला कंपनीने आता ऑटो सेक्टरमध्ये देखील एन्ट्री घेतली आहे.   Ola ने एकाचवेळी लाँच केल्या 5 जबरदस्त इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. ओला कंपनी 15 ऑगस्ट हा दिवस  ग्राहक दिन म्हणून साजरा करते. यामुळेच 15 ऑगस्ट दिवशी कंपनीने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. या सर्व बजेट स्कूटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

1/5

या स्कूटरमध्ये प्रति तास 90 KM इतका टॉप स्पीड मिळतो. तर, एकदा चार्ज केल्यावर स्कूटर 151 KM इतकी ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे.   

2/5

 S1 Air आणि S1 Pro या स्कूटर  Ola S1 चे अपडेट व्हर्जन आहेत. इंजिन बॅटरी तसेच डिजाईनमध्ये देखील बरेच बदल करण्यात आले आहेत. 

3/5

Ola S1 X  या स्कूटरमध्ये  90 KM इतका टॉप स्पीड आणि 151 KM इतकी ड्रायव्हिंग रेंज मिळते. 

4/5

S1X+, S1X (3kWh) आणि S1X यांच्या किंमती अनुक्रमे 1,09,999 रुपये, 99,999 रुपये आणि 89,999 रुपये (एक्स-शोरूम)  अशी आहे. मात्र, 21 ऑगस्टपूर्वी या स्कूटर बुक केल्यास या स्कूटर अनुक्रमे 99,999 रुपये, 89,999 रुपये आणि 79,999 इतक्या किंमतीत मिळणार आहेत.

5/5

OLA S1X एकूण तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केलेय. S1X+, S1X (3kWh) आणि S1X (2kWh) असे हे मॉडेल आहेत. तसेच S1 Air आणि S1 Pro या स्कूटर लाँच झाल्या आहेत.