सावधान! 'फेसबुक'वरून येतायत मेल, तुमचं मोठं नुकसान करू शकतात
हा फसवणूक ईमेल युजर्संचे आवश्यक तपशील चोरण्याच्या उद्देशाने पाठविला जात आहे आणि ही योजना अत्यंत चतुराईने राबविली जात आहे.
Online Scam Fake Facebook Mails Alert : इंटरनेटचा वापर वाढत असल्याने ऑनलाइन घोटाळ्याच्या घटनाही वाढत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात असं आढळून आलं आहे की जीमेल आणि हॉटमेल युजर्संना एक धोकादायक मेल येत आहे, जो त्यांच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतो. स्कॅमर हे मेल पाठवत आहेत, पण हा मेल 'फेसबुक' वरून आल्याचं दिसत आहे. हा फसवणूक ईमेल युजर्संचे आवश्यक तपशील चोरण्याच्या उद्देशाने पाठविला जात आहे आणि ही योजना अत्यंत चतुराईने राबविली जात आहे.