पृथ्वीवरुन दिसतो फक्त एकच... पण आकाशात आहेत 761 चंद्र; मग ते दिसत का नाहीत?

आकाशात 10 हजारपेक्षा जास्त चंद्र असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

| Jul 09, 2024, 20:13 PM IST

Moon In Solar System : रात्रीच्या अंधारात आपल्याला चंद्र दिसतो. आपण जो पाहतो तो आपल्या पृथ्वीचा चंद्र आहे. मात्र, आपल्या सूर्यमालेत  761 चंद्र आहेत. संशोधकांनी हे चंद्र शोधले आहेत.  हे चंद्र आपल्याला दिसत नाहीत. कारण हे सूर्यामालेतील ग्रहांचे चंद्र आहेत. 

1/7

 पृथ्वीवरुन आपल्याला एकच चंद्र दिसतो. प्रत्यक्षात मात्र, आपल्या सूर्यमालिकेत 761 चंद्र आहेत. 

2/7

 संशोधक सातत्याने सूर्यमालेतील नविन चंद्र शोधत आहे. सूर्यमालेत जवळपास 10 हजार पेक्षा अधिक चंद्र असू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे.    

3/7

नेपच्यूनचे दोन चंद्र आणि युरेनसभोवती एकच चंद्र  देखील शोधला आहे. 

4/7

अनेक खगोलशास्त्रज्ञांनी  2023 च्या सुरुवातीस शनिभोवती किमान 62 नवीन अनियमित चंद्र तसेच 12 नवीन जोव्हियन चंद्र शोधले आहेत. 

5/7

 नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने एकूण 473 चंद्र शोधले आहेत. हे चंद्र लघुग्रहांचे आहेत.  

6/7

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने (IAU) सूर्यमालेतील आठ ग्रहांभोवती फिरणारे 288 चंद्र शोधले आहेत.   

7/7

 पृथ्वीला एकच ग्रह आहे. मात्र, आपल्या सूर्यमालेतील शनि आणि गुरू यासह इतर ग्रहांना अनेक चंद्र आहेत.