OTT Releases : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपट, मालिकांचा OTT धमाका

Friday OTT Releases : ऑगस्टचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून आज आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात प्रदर्शित होणारे काही चित्रपट आणि मालिकांबद्दल सांगणार आहोत. 

Aug 28, 2024, 16:40 PM IST
1/6

आता या आठवड्याच्या यादीत 'IC 814' हे कंधार हायजॅक हा चित्रपट तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. 1999 मध्ये घडलेली अपहरणाची सर्वात मोठी घटना पडद्यावर दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही 29 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

2/6

'गॉडझिला एक्स काँग द न्यू एम्पायर' या चित्रपटात गॉडझिला आणि काँग यांच्यातील मानवतेच्या विरोधातला लढा दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 29 ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

3/6

'द रिंग्ज ऑफ पॉवर सीझन 2' चा दुसरा सीझन रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा खलनायक सौरेनची दहशत पाहायला मिळणार आहे. तुम्ही 29 ऑगस्टला प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

4/6

अल्लू सिरिशच्या 'बडी' मालिकेची कथा हवाई वाहतूक नियंत्रक अधिकारी पल्लवीची आहे. जिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा टेडी बेअरमध्ये प्रवेश करतो. हा तुम्ही 30 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

5/6

केके मेनन, झाकीर हुसेन आणि तनुज विरवानी यांच्या कथेवर बनलेला 'मुर्शीद' ही एका माणसाची कथा आहे, जो पूर्वी डॉन असायचा, पण नंतर त्याने सगळं सोडून दिलं. मात्र, नंतर काही कारणाने त्यांना पुन्हा या जगात यावे लागले. हा चित्रपट ZEE5 वर 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

6/6

नेटफ्लिक्सचा आगामी हॉरर-थ्रिलर द डिलिव्हरन्स आपल्या मुलांसह नवीन घरात राहणाऱ्या संघर्ष करणाऱ्या अविवाहित आईच्या जीवनाचा शोध घेते. नवीन जीवन सुरू करण्याचे स्वप्न एक अनपेक्षित वळण घेते जेव्हा एक वाईट आत्मा त्यांच्या जीवनात उधळतो. आगामी नाटक एका सत्यकथेवर आधारित आहे.