मुरुड जंजीरा किल्ल्याला टक्कर देतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला भव्यदिव्य पद्मदुर्ग

मुरुड जंजीराला टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीशी लढत-लढतच समुद्रात भव्य किल्ला बांधला. 

| Aug 27, 2024, 22:39 PM IST

Padmadurg Fort Murud Janjira : महाराष्ट्रातील गड किल्ले हे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत.  रायगड जिल्ह्यात असेलला पद्मदुर्ग  हा किल्ला नैसर्गिक सौंदर्याची आणि वैभवाची उत्तम झलक दाखवतो. हा किल्ला मुरुड जंजीरा किल्ल्याप्रमाणे भव्य आहे. 

 

1/7

रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.

2/7

  छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये बांधलेल्या सागरी किल्ल्यांपैकी पद्मदुर्ग आहे.  शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्रं दिवस एक करुन, सिद्दीशी लढत-लढतच किल्ल्याची उभारणी केली. किल्ल्याच्या तटबंदीवरून मुरुडचा किनारा, जंजिरा किल्ला आणि सामराजगड किल्ला दृष्टीक्षेपात येतो. तर, या किल्ल्यावरुन सुमद्राचे सुंदर लँडस्केप पहायला मिळते. 

3/7

या बुरुजाच्या चर्र्यांरना कमळाच्या पाकळ्र्यांजसारखा आकार दिलेला आहे. त्यामुळेच या किल्ल्याचे नाव ‘ पद्‌मदूर्ग’ पडले असावे. समुद्रात मोठ्या दिमाखात उभा असेलला हा भव्य किल्ला किनाऱ्यावरुनच पर्यटकांना आकर्षित करतो. किल्ल्याचे बांधकाम अतिशय भक्कम आणि मजबूत आहे. 

4/7

छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला 348 वर्ष जुना हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. पद्‌मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ट्येपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दुरुनच लक्ष वेधून घेते.

5/7

मुरुड - जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा हा पद्‌मदूर्ग किल्ला पहाण्यासाठी जात नाहीत. मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे पद्‌मदूर्गला जाण्यासाठी बोटींची तितकी व्यवस्था नाही. मुरुडहून खाजगी होडी करुन या किल्ल्यावर जावे लागते.

6/7

मुरुडच्या किनार्या वरुन पश्चिमेला समुद्रात एक भव्य किल्ला दिसतो तोच हा किल्ला.  पद्‌मदूर्ग असे या किल्ल्याचे नाव आहे. हा किल्ला कासा किल्ला नावाने देखील ओळखला जातो.

7/7

मुरूड जंजीरा किल्ला हा अजिंक्य किल्ला आहे. मुरुड जंजीराला किल्ला जिंकता आला नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातच असाच भव्य किल्ला बांधला.