PAK vs NZ: पुन्हा विश्वविजेता बनण्यापासून चुकली New Zealand; 'या' चुकांमुळे भंगलं स्वप्न!

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या विजयामुळे पाकिस्तानने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला 153 रन्सचं आव्हान दिलं होतं.  अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने हे आव्हान पूर्ण करत 7 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने हा सामना कोणत्या 4 कारणांमुळे गमावला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Nov 09, 2022, 21:27 PM IST
1/4

पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय

या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीमला चांगली सुरुवात करता आली नाही. फिन ऍलन लवकर आऊट झाला. डेव्हन कॉन्वेलाही चांगला खेळ करता आला नाही. या टीमला सहा ओव्हरमध्ये केवळ 38 रन्स करता आले. 

2/4

कर्णधाराचा हळू खेळ

कर्णधार केन विलियम्सनला लवकर मैदानात उतरावं लागलं होतं. यावेळी केन 17 व्या ओव्हरपर्यंत मैदानावर टिकला. पण त्याने टी-20 मध्ये जसा खेळा करायला हवा होता तसा केला नाही. केनने 42 बॉल्समध्ये केवळ 46 रन्स केले. 

3/4

वाईट फिल्डींग

खराब फिल्डींग हे टीमच्या पराभवाचं प्रमुख कारण मानलं जातंय. पहिल्याच ओव्हरमध्ये डेव्हन कॉन्वेने ट्रेंट बोल्टच्या बॉलवर बाबर आझमचा कॅच सोडला. याशिवाय ईश सोधीनेही बाबरला रनआऊट करण्याची संधी गमावली. 16 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मिचेल सँटनरने टिम साऊदीच्या बॉलवर मोहम्मद हॅरिसचा कॅच सोडला.

4/4

टीमचे गोलंदाज

न्यूझीलंडचे गोलंदाज चांगले आहेत मात्र या सामन्यात त्यांना चांगला खेळ करता आला नाही. त्यांना ना विकेट घेता आल्या ना फलंदाजांना रोखण्यात यश आलं. या सामन्यात किवी टीमचे गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसले नाहीत.