बादशाहचं पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर अफेयर? बाबर आझम कनेक्शन चर्चेत; ती म्हणाली, 'माझं लग्न...'

Badshah Dating Pakistani Actress: प्रसिद्ध रॅप सिंगर बादशाह या पाकिस्तानी अभिनेत्रीला दुबईमध्ये भेटला होता. त्या भेटीगाठीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या अभिनेत्रीचं बाबर आझम कनेक्शनही समोर आलं आहे. या अभिनेत्रीने आता या चर्चांबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. कोण आहे ती आणि काय म्हणाली आहे जाणून घेऊयात...

| May 26, 2024, 12:21 PM IST
1/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

पाकिस्तानी अभिनेत्रीने प्रसिद्ध भारतीय रॅप गायक बादशाहसंदर्भात सूचक विधान केलं आहे. या पाकिस्तानी अभिनेत्रीचं बादशाहबरोबर अफेयर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

2/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

ज्या अभिनेत्रीसंदर्भात आपण बोलत आहोत त्या अभिनेत्रीचं नाव आहे हानिया आमिर!

3/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

सध्या हानिया आणि बादशाहचे प्रेमसंबंध असून त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यापासून या चर्चांना उधाण आलं आहे.

4/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

बादशाह आणि हानिया हे दोघे डिसेंबर 2023 मध्ये दुबईत एकमेकांना भेटले होते. त्यांनी त्यावेळी रात्री एकत्र डिनर केला होता. तेव्हाचे फोटो सध्या व्हायरल झाले असून पुन्हा चर्चेत आले आहेत.  

5/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

मात्र हानियाबरोबर अफेयर सुरु असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्यानंतरही बादशाहने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता या कथित अफेयरवर हानिया पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.

6/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

एप्रिल 2024 मध्ये हानियाने बादशाहबरोबरचा एक फोटोही पोस्ट केला होता.

7/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

या फोटोला हानियाने, "चंदीगढवरुन मदत आली," असं म्हटलं होतं. याबरोबर तिने डिनर टेबलचा फोटो पोस्ट केला होता ज्यात अनेक पदार्थ दिसत होते. तिने एक छोटा व्हिडीओही पोस्ट केलेला ज्यात ती काही पेयांचा आनंद घेताना दिसली होती.

8/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

हानियाने शेअर केलेल्या अन्य एका व्हिडीओत ती आणि बादशाह हे दोघे बादशाहच्या गाण्यावरच नाचताना दिसत होते. अचानक गाणं विसरल्यानंतर दोघे जोरजोरात हसताना या व्हिडीओत दिसले. हानियाने या व्हिडीओला, 'कॉनर्स्ट टाइम' अशी कॅप्शन दिलेली.  

9/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

"या म्युझिक फेस्टीव्हल आणि अभिनयाबद्दल काय बोलावं," अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर बादशाहने नोंदवली होती. त्यामुळे या दोघांच्या अफेयरच्या चर्चांना उधाण आलेलं.  

10/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

हानियाला नुकत्याच घेतलेल्या बीबीसी एशियन नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये तिच्या सध्याच्या आवडत्या गाण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने, "बादशाह, हितेन आणि करण औजलाचं 'गॉड डॅम' गाणं मला फार छान वाटतं," असं उत्तर दिलं.  

11/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

यावर मुलाखतकाराने बादशाहचं नाव घेतल्याबद्दल हसत प्रतिसाद दिल्यानंतर हानियाने, "नाही, खरंच हे फार छान गाणं आहे," असं म्हटलं.  

12/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

पुढे बादशाहबरोबरच्या कथित प्रेमप्रकरणाबद्दल हानियाने, "माझं लग्न झालेलं नाही माझी एकमेव अडचण ही आहे की असं मला कधीतरी वाटतं. लग्न झालं असतं तर मी या अशा साऱ्या अफवांपासून दूर राहिले असते," असं म्हटलं.  

13/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

हानिया आणि बादशाह हे दोघे मागील वर्षी दुबईत भेटल्यानंतर एकत्र शॉपिंगसाठी आणि नंतर कॉफी पिण्यासाठी गेले होते.

14/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

विशेष म्हणजे हानियाचं पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमबरोबरच अफेयर असल्याची चर्चाही पाकिस्तानी मनोरंजन सृष्टीत आहे.

15/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

हानियाने 2016 साली जनान या कॉमेडी चित्रपटामधून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. 

16/16

Badshah Dating Pakistani Actress Babar Azam Connection

हानियानेने 'ना मालूम आफराद-2', 'परवाज है जुनून' या आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हानिया ही किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खानची मोठी चाहती आहे.