'निसर्ग पुरुष अन् महिलांसाठी सारखा नसतो, लोक महिलांच्या...'; 7 वर्षांच्या ब्रेकबद्दल प्रीतीचं सूचक विधान

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटानं वीरा जारा, दिल से, कल हो ना हो सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण आता ती स्क्रीनवर दिसत नाही. जवळपास सहा वर्षां ती स्क्रिनवर दिसलीच नाही. आता तिनं या संबंधीत खुलासा केला आहे.   

| May 26, 2024, 11:41 AM IST
1/7

प्रीती झिंटा

प्रीती झिंटान ही जवळपास 6 वर्ष इंडस्ट्रीपासून लांब राहिली आहे. त्याचं कारण काय होतं याचा खुलासा तिनं केला आहे. 

2/7

खासगी आयुष्यावर लक्ष

DD इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रीतीनं खुलासा केला की 'मला चित्रपट करायचं नव्हतं. मी माझ्या बिझनेसवर फोकस करत होते आणि मला खासगी आयुष्यावरही लक्ष द्यायचे होते.' 

3/7

महिलांसाठी क्राफ्ट गरजेचा

प्रीतीनं महिलांच्या बायोलॉजिकल क्लॉक विषयी बोलताना सांगितलं की,'लोकं हे विसरतात की महिलांसाठी एक कलाकार म्हणून क्राफ्ट हा महत्त्वाचा असतो. पण एक बायोलॉजिकल क्लॉक देखील होतात. निसर्ग महिला आणि पुरुषांसाठी समान नाही. त्यामुळे मी कधी इंडस्ट्रीत कोणाला डेट केलं नाही.'

4/7

स्वत: चं आयुष्य विसरायला नको

प्रीती पुढे म्हणाली, 'महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला देखील माझं कुटुंब हवं होतं. एक कलाकार म्हणून आयुष्य जगणं योग्य आहे. पण तुम्ही स्वत:चं आयुष्य विसरायला नको'.

5/7

कलाकारासोबत अफेअरवर म्हणाली...

कलाकारांशी अफेयरवर प्रीती म्हणाली, 'माझं कधी कोणत्या कलाकारासोबत अफेअर नव्हतं. माझं स्वत: चं कुटुंब असावं हे देखील तितकंच महत्त्वाचं होतं. स्क्रीनवर अनेक भूमिका साकारणं चांगलं आहे पण आयुष्य जगणं देखील महत्त्वाचं आहे.' 

6/7

मुलं हवी होती

प्रीतीनं पुढे सांगितलं की 'तिला मुलं हवी होती. बिझनेस करण्यासाठी ती एक्सायटेड होती. पण तिला सगळ्यात जास्त लक्ष हे खासगी आयुष्यावर द्यायचं होतं.'   

7/7

यशस्वी कलाकार

यशस्वी कलाकार होण्यापेक्षा कुटुंब असणं महत्त्वाचं सांगत प्रीती म्हणाली, 'मी एक यशस्वी कलाकार व्हावं आणि आयुष्यात एकटंच रहावं असं मला मुळीच नको होत. सहा वर्षात तिनं अनेक स्क्रिप्ट वाचल्या पण तिला कोणती स्क्रिप्ट इतकी जास्त आवडली नाही.' आता अखेर 'लाहौर 1947' या चित्रपटातून ती इंडस्ट्रीत कमबॅक करणार आहे. तिच्यासोबत सनी देओल दिसणार आहे. त्या आधी 'भैय्याजी सुपरहिट' हा तिचा आधीचा चित्रपट देखील सनीसोबत होता.