भारताला मोठा धक्का! गोल्ड मेडल जिंकणारा 'हा' खेळाडू डोपिंगमध्ये दोषी, तब्बल 18 महिन्यांची बंदी

Paris Paralympics 2024: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स स्पर्धेनंतर आता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अशातच आता भारताला मोठा धक्का (Para shuttler Pramod Bhagat suspended) बसलाय.

| Aug 13, 2024, 18:07 PM IST
1/5

प्रमोद भगत

टोकियो येथील पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता बॅडमिंटनपटू प्रमोद भगत ( Pramod Bhagat) याच्‍यावर 18 महिन्‍यांची बंदी घालण्‍यात आली आहे. 

2/5

अँटी डोपिंग

डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आलीये. अँटी डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रमोद भगत हा दोषी आढळला होता. 

3/5

मेडल गेलं

त्यानंतर आता त्याला पॅरिस पॅरालिम्पिकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे भारताचं पक्कं असणारं मेडल आता खात्यात जोडलं जाणार नाही.

4/5

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन

भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये खेळणार नाही, याची घोषणा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने केली आहे. 

5/5

पोलिओ

दरम्यान, 1988 मध्ये जन्मलेल्या प्रमोद भगतला वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. त्यानंतर प्रमोदने वयाच्या 13 व्या वर्षी त्याने बॅडमिंटन खेळण्याचा निर्णय घेतला अन् भारताला पदक मिळवून दिलेत.