Cheapest Flight : मसालाडोसाच्या किंमतीत विमान प्रवास, 'ही' आहे भारतातील सर्वात स्वत एअरलाईन्स

तुम्हालाही हे वाचून आश्चर्य झालं असेल ना... आता तुम्ही फक्त 80 रुपयात विमानातून प्रवास करू शकता. तुम्ही बरोबर वाचलंय... इंडिगो किंवा एयर इंडिया सारख्या मोठ्या एअरलाइनला आता विसरून जा. भारतात एक अशी एयरलाइन आहे जी तुम्हाला 80 रुपयात विमानाचा प्रवास करण्याची संधी देणार आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया... 

| Aug 13, 2024, 17:21 PM IST
1/7

एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे फ्लाइटच्या तिकिटांचे वाढणारे दर याविषयी काही बोलताच येत नाही. तर भारतात एक एअरलाइन कंपनी आहे. जी खूप कमी पैशांमध्ये तुम्हाला विमानानं प्रवास करण्यासाठी ऑफर देत आहे. 

2/7

हा स्वस्तातील दर एलायंस एयरकडून करण्यात येत आहे. या एअरलाइननं गुवाहाटी आणि शिलॉंगमध्ये असलेला जो प्रवास आहे तो फक्त 50 मिनिटात करू शकता. या विमानात बसून तुम्ही खिडकीतून बाहेर दिसत असलेलं सुंदर दृष्य पाहू शकता. 

3/7

गुवाहाटी आणि शिलॉंगमध्ये खूप कमी अंतर आहे. त्यामुळे या रूटवर विमानानं प्रवास करण्यासाठी खूप कमी खर्च येतो. त्याशिवाय एलायंस एयरसारखी कंपनी कमी दरात हा प्रवास करण्याची संधी देतं. 

4/7

पेटीएम अॅपवर या विमानानं प्रवास करण्यासाठी किती रक्कम खर्च करावी लागते ते तपासल्यानंतर कळलं की गुवाहाटी ते शिलॉंगसाठीसाठी असलेलं भाडं हे फक्त 400 रुपये आहे. पण जेव्हा तिथे प्रोमो कोड वापरला तर त्यावर 320 रुपयांची ऑफर मिळाली. त्यामुळे फ्लाईटचं तिकिट हे 80 रुपये झालं. त्याशिवाय जेव्हा बूकिंगची वेळ येते तेव्हा कन्वीनियंस फी जोडण्यात येते. 

5/7

नागरिकांना उड्डयन मंत्रालयानं त्यांना हवेतून होणारी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यास आणि त्याशिवाय ते परवडणार असेल याचे आदेश दिले होते. 21 ऑक्टोबर 2016 ला UDAN लॉन्च करण्यात आलं होतं. यामुळे भारतातील अनेक ठिकाणच्या रुट्सच्या फ्लाईटची तिकिटांचे दर हे कमी करण्यात आले. 

6/7

जर गुवाहाटी ते शिलॉंग किंवा शिलॉंग ते गुवाहाटीचा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सगळ्यात स्वस्त असलेल्या या फ्लाईटचा वापर करू शकता. 

7/7

त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ट्रॅव्हल वेबसाइट्सचा किंवा अॅप्सचा वापर करून त्याची तुलना करू शकता. त्यासोबत एयरलाइंसची वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन तुम्ही बूकिंग करू शकता.