घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार
राज ठाकरे आझाद मैदानावर सभा घेणार
मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मनसे भव्य मोर्चा काढत आहे. हा मोर्चा गिरगावपासून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारे आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आझाद मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत. या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्ते मरिन लाइन्स इथल्या हिंदू जिमखाना इथून आझाद मैदानात जाणार आहे.