शबाना आझमींच्या अपघाताची बातमी कळताच सेलेब्रिटींची रूग्णालयाकडे धाव

अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघाताची बातमी कळताच समस्त बॉलिवूडकरांना मोठा धक्काच बसला.

Jan 19, 2020, 10:45 AM IST

मुंबई : अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघाताची बातमी कळताच समस्त बॉलिवूडकरांना मोठा धक्काच बसला. मुंबई-पुणे महामार्गवर शनिवारी त्यांचा अपघात झाला. त्यांची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सेलेब्रिटींनी आपला मोर्चा रूग्णालयाकडे वळवला. 

1/6

गीतकार जावेद अख्तर

गीतकार जावेद अख्तर

पत्नी शबानांची भेट घेण्यासाठी पती आणि गीतकार जावेद अख्तर रूग्णालयात दाखल झाले होते.  

2/6

अभिनेत्री तब्बू

अभिनेत्री तब्बू

अपघात झाल्याची बातमी कळताच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात दाखल झाली होती.   

3/6

अभिनेता अनिल कपूर

 अभिनेता अनिल कपूर

शबाना यांना भेटण्यासाठी अभिनेता अनिल कपूर देखील रूग्णालयात पोहोचला होता.  

4/6

दिग्दर्शक मेघना गुलजार

दिग्दर्शक मेघना गुलजार

दिग्दर्शक मेघना गुलजार यांना देखील रूग्णालयाच्या गेटवर स्पॉट करण्यात आले.  

5/6

झोया

झोया

जावेद अख्तर यांची मुलगी झोया देखील रूग्णालयात पोहोचली.  

6/6

दिग्दर्शक फरहान अख्तर

दिग्दर्शक फरहान अख्तर

जावेद अख्तर यांचा मुलगा अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर देखील रूग्णालयात पोहोचला.