आकाश अंबानीच्या मेहुणीचे Photo पाहिलेत का? सुपर मॉडेललाही देते टक्कर

Diya Mehta Style : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या मुलाची सध्या लगीनघाई सुरु आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा संपन्न झाला आहे. राधिका मर्चंट (Radhika Merchant) तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे. तर मुकेश अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताही (Shola Mehta) सौंदर्याच्या बाबतीत कमी नाही. दरम्यान श्लोका मेहताची बहिणीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून तिच्या स्टाईलीश लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Mar 07, 2023, 17:18 PM IST
1/7

आकाश अंबानी याची पत्नी श्लोका मेहता ही प्रसिद्ध उद्योगपती रसेल मेहता यांची मुलगी. श्लोकाला एक बहिण असून तिचं नाव दीया मेहता (Diya Mehta) असं आहे. 

2/7

2017 मध्ये दीया मेहताचं लग्न आयुष जटिया याच्याशी झालं. दीया मेहता आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये हातभार लावते. 

3/7

दीया मेहता आपल्या स्टाईल लूकसाठी ओळखली जाते. स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत ती सुपरमॉडल्सलाही टक्कर देते. दीयाने लंडनमध्ये फॅशन कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 

4/7

फॅशनबरोबरच दीया इन्स्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आहेत. सोशल मीडिया वेबासईटवर ती मॉडलिंगचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस आणि स्टायलीश दिसते.

5/7

ट्रेडिशनल असो की पार्टी लूक दीया मेहताचं सौंदर्य प्रत्येक लूकमध्ये खुलून दिसतं. 

6/7

नुकताच दीयाने आपला समर लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली.

7/7

दीया मेहताचे सोशल मीडियावर लाखोने फॅन्स आहेत. तीने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची लाखोने लाईक्स मिळत असतात.