मुलांना रोज डब्याला काय द्यायचं प्रश्न पडतो? 'या' पौष्टिक अन् चविष्ट रेसिपी पाहा!

Healthy Kids Lunch Box Recipes in Marathi: मुलांना रोज रोज डब्यात काय द्यायचे असा प्रश्न समस्त आई वर्गाला पडलेला असतो? आज आम्ही तुम्हाला हेल्दी व झटपट होणाऱ्या रेसिपी सांगणार आहोत. 

| Feb 29, 2024, 15:50 PM IST

Kids Lunch Box Recipes Ideas: मुलांना रोज रोज डब्यात काय द्यायचे असा प्रश्न समस्त आई वर्गाला पडलेला असतो? आज आम्ही तुम्हाला हेल्दी व झटपट होणाऱ्या रेसिपी सांगणार आहोत. 

1/7

मुलांना रोज डब्याला काय द्यायचं प्रश्न पडतो? 'या' पौष्टिक अन् चविष्ट रेसिपी पाहा!

tiffin box recipes for school indian in marathi

 डब्याला रोज रोज पोळी भाजी खावून मुलांना कंटाळा येतो. मग अशावेळी मुलं डबा तसाच घरी घेऊन येतात.  मुलांना डब्यात काय वेगळं द्यायचा असा प्रश्न पडला असेल तर हे पदार्थ एकदा ट्राय करुन पाहाच 

2/7

दलिया उपमा

tiffin box recipes for school indian in marathi

चविष्ट आणि पौष्टिक असं काही मुलांना द्यायचे असेल तर दलिया उपमा हा चांगला पर्याय आहे. दलिया उपमा बनवण्यासाठी रव्याच्या ऐवजी दलिया वापरा आणि त्यात कांदा, गाजर, मटार, शिमला मिरची, बिन्स या सारख्या भाज्या वापरा. यामुळं मुलांना पोषणदेखील मिळेल.

3/7

व्हेजिटेबल पोहा

tiffin box recipes for school indian in marathi

पोह्यात अनेक पौष्टिक घटक असतात. नेहमीसारखे पोहे न बनवता त्यात गाजर, काजू, शेंगदाणे, बटाटे, मटार यासारख्या भाज्या वापरा. 

4/7

सँडविच

tiffin box recipes for school indian in marathi

जास्तकरुन मुलांना सँडविच खायला आवडते. अशावेळी तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वापरुन किंवा पनीर वापरुन सँडविच बनवू शकता.   

5/7

पनीर पराठा

tiffin box recipes for school indian in marathi

पनीर आणि इतर भाज्या वापरुन हा पराठा तयार करुन पनीर पराठा मुलांना डब्यात देऊ शकतात. पराठ्यासोबत दही किंवा सॉसदेखील तुम्ही देऊ शकता. 

6/7

व्हेजिटेबल ऑमलेट

tiffin box recipes for school indian in marathi

कांदा, गाजर, टॉमेटोसारख्या भाज्या वापरुन व्हेजिटेबल ऑमलेट तुम्ही बनवू शकता. एक्स्ट्रा फायबर मिळवण्यासाठी टोस्टसोबत मुलांना डब्यात देऊ शकतात.   

7/7

व्हेजिटेबल इडली

tiffin box recipes for school indian in marathi

इडलीच्या पीठात बीन्स, गाजर, शिमला मिरची, कॉर्न, मटारसारख्या भाज्या वापरुन व्हेजिटेबल इडली बनवू शकता. यात पौष्टिकतेबरोबरच चवदेखील आहे. यासोबत नारळाची चटणी देऊ शकता.