लग्न जमण्यास अडथळे येताहेत? शिव-पार्वतीचे हे व्रत केल्यास इच्छा पूर्ण होतील

  Margshirsh Ravi Pradosh Vrat 2023: विवाहास अडथळे येत असतील तर अनेक देवधर्म करून सुद्धा लग्नाचा योग जुळून येत नाहीयेत.यावर्षीच्या शेवटच्या प्रदोष व्रतादिवशी भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केल्यानं तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते याबद्दल सांगितलं आहे.

Dec 06, 2023, 18:28 PM IST

 
Margshirsh Ravi Pradosh Vrat 2023: प्रदोष व्रत केल्यानं जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. यावर्षीच प्रदोष व्रत 10 डिसेंबर2023 ला आहे . विवाहास विलंब होत असेल तर हे प्रदोष व्रत करणं महत्वाचं आहे.प्रदोष व्रत केल्यानं मिळणारे फळ याबद्दल सांगितले आहे. 

1/7

विवाहास विलंब होत असेल, लग्न ठरताना अडथळे येत आहेत? अशा समस्या येत असतील तर शास्त्रानुसार प्रदोष व्रत केल्याने यावर उपाय मिळतो. यावर्षीच शेवटचे प्रदोष व्रत 10 डिसेंबर 2023 ला आहे. जाणून घेऊया प्रदोष व्रताचे फायदे आणि महत्त्व

2/7

प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केल्यास त्याचा आशीर्वाद लाभतो, असं मानतात. 

3/7

 प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला जलाभिषेक करावा. बेलपत्र, मूठभर मूग आणि गुळाचे खडे भगवान शंकराला अर्पण करावे, अशी मान्यता आहे. 

4/7

मुलींचे लग्न जमण्यास अडथळे येत असतील तर स्नान केल्यानंतर लाल रंगाचे कपडे घालून शंकराचे नामस्मरण करावे.

5/7

लग्नासाठी योग्य स्थळ मिळावं आणि विवाह लवकर होण्यासाठी देवी पार्वतीला कुंकू वाहून प्रार्थना करावी.

6/7

प्रदोष व्रतादिवशी अविवाहितांनी जर हे छोटे छोटे उपाय केलेत तर नक्कीच विवाहयोग लवकर येऊ शकतो. शंकर - पार्वती प्रसन्न व्हावे म्हणून या दिवशी व्रत करणं महत्वाचं आहे.

7/7

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)