रात्रीत स्टार झाले 'हे' सर्वसामान्य व्यक्ती

सोशल मीडिया, सामान्य व्यक्तींची असामान्य ताकद  

Mar 04, 2020, 15:03 PM IST

मुंबई : सोशल मीडिया मध्यम हे आताच्या काळतील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातो. सामान्या व्यक्तींपासून ते सेलिब्रिटी देखील त्यांचं कौशल्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणतात. त्यामध्ये टीक-टॉक सर्व तरूणांसाठी आवडतीचा विषय आहे. सोशल मीडियामुळे अनेक लोक एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन ठरले आहेत. 

1/5

रानू मंडल

रानू मंडल

पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल आज प्रसिद्ध गायकांच्या यादीत बसल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी 'तेरी मेरी कहानी' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे.

2/5

झोमॅटो बॉय सोनू

झोमॅटो बॉय सोनू

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. सोनू हा झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय आहे. एका स्माइलमुळे सोशल मीडियाला आपल्या प्रेमात पाडणाऱ्या सोनूचं निरागस हास्य पाहून सर्वेच घायाळ झाले. आता त्याच्या स्माइलचा फोटो एका मोठ्या चिप्स कंपनीच्या पाकिटावरच वापरलाय.

3/5

सागर गोस्वामी

सागर गोस्वामी

अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी सागर इंटरनेट सेंसेशन ठरला आहे. 'तेरी तेरी दो अखियां' या गाण्याचा त्याचा टीक-टॉक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

4/5

संजीव श्रीवास्तव

संजीव श्रीवास्तव

डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांचा गोविंदा स्टाईल डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हे डान्सिंग अंकल म्हणजे मध्य प्रदेशातील एका महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक आहेत.

5/5

अहमद शाह

अहमद शाह

हा गोंडस मुलगा तुमच्या नक्कीच लक्षात असेल. 'पिछे देखो' हा त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच चांगलाच ट्रेंड झाला होता.