मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सोलापूर दौरा

' हे सरकार शेतकऱ्यांच आहे...'  

Oct 19, 2020, 15:38 PM IST

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सध्या रामपूर येथे आहेत. याठिकाणी त्यांने शेतकऱ्यांना दिलासा देत धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभं आहे. असं देखील ते म्हणाले. 

1/5

अतिवृष्टी होवू नये हिच प्रार्थना. पण जी काही मदत करायची आहे, त्यामध्ये सरकार कोठेही मागे राहणार नाही. असं अश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलं.   

2/5

त्याचप्रमाणे किती नुकसान झालंय याचं पंचनामे सुरू आहेत, माहिती घेतली जात असून लगेचच मदत जाहिर करू. गरज पडल्यास केंद्राकडे मदत मागू, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.   

3/5

 हे सरकार शेतकऱ्यांच आहे', असं म्हणतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.   

4/5

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या १० वारसांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ४ लाखांची मदत यावेळी केली.   

5/5

ऐन कापणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढं उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर आजी-माजी राज्यामध्ये पहाणी दौरा करत आहेत.