'या' महिलेच्या शरीरात नाहीय हृदय, एका बॅगेने वाचवलाय जीव, पाहा कसं...
जीवनात कायम चढ-उतार येत असतात.
जीवनात कायम चढ-उतार येत असतात. काही जण मोठ्या धैर्याने समोर आलेल्या संकटांचा सामना करतात तर काही मात्र खचून जातात. परंतु लंडनमधील रहिवासी असलेल्या सलवा हुसैन (Selwa Hussain)यांनी जीवनाचं एक वेगळं मंत्र सर्वांना दिलं आहे. सलवा यांच्या शरीरात ह्रदय नाही. सलवा यांचं ह्रदय त्यांच्या पाठी असलेल्या बॅगेत आहे. अनेक संकटांचा सामना करत असताना देखील सलवा यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं. त्यांच्या कुटुंबाला मात्र त्यांची चिंता कायम लागून राहते.