झगमगत्या दुनियापासून दूर राहूनही नावाजलेले कलाकार

चंदेरी दुनियेला कलाकारांचा रामराम 

Apr 05, 2020, 15:02 PM IST

एकदा या  झगमगत्या, चंदेरी, रूपेरी दुनियेत पाय ठेवला आणि यशाच्या उच्च शिखरावर पोहोचत असताना अचानक ती वाट सोडून दुसरी वाट पकडणं फार कठिण असतं. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करियरच्या दिशा बदलल्या तरी मात्र आता संपूर्ण जगात त्याच्या नावाची चर्चा असते. यापैंकी काही निवडक कलाकार

1/5

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्ना

१९९५ साली प्रदर्शीत झालेल्या 'बरसात' चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने 'बादशाह', 'लव्ह के लिये कुछ भी करेगा', 'ये है मुंबई मेरी जान' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले होते. पण २००१ नंतर तिने कलाविश्वाला पाठ दाखवली आणि आपला मोर्चा इंटेरियर डिझायनर आणि लेखक या दिशेने वळवला. यामध्येही तिने यश मिळवले आहे. 

2/5

सोहा अली खान

सोहा अली खान

'दिल मांगे मोर' या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या  सोहाच्या नावावर 'खोया खोया चांद', 'रंग दे बसंती', 'तुम मिले', '९९' चित्रपटे आहेत. तिच्या अभिनयाचे कौतुक देखील होत होते. पण अभिनेता किनल केमूसोबत लग्न केल्यानंतर तिने चित्रपट सृष्टीला राम राम ठोकला. त्यानंतर ती लेखक म्हणून नावारूपास आली. “द पेरिल्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस” हे पुस्तक तिने लिहलं आहे.

3/5

डिनो मोरिया

डिनो मोरिया

मॉडलिंगच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पाय ठेवणारा आभिनेता डिनो मोरिया रूपेरी पडद्यावर फेल ठरला. आता त्याचा मुंबईत हॉटेल आहे.  

4/5

प्रिती झिंटा

प्रिती झिंटा

नेहमी आपल्या हास्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिती झिंटाने 'दिल से' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. कलाविश्वाला रामराम ठोकत तिने क्रिकेट विश्वात आपले नशिब आजमावले. शिवाय आज संपूर्ण जगात ती ओळखली जाते. 

5/5

मयूरी कांगो

मयूरी कांगो

लग्न झाल्यानंतर मयूरीने कांगो चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. आता ती Googleच्या गुरग्राम ऑफिसमध्ये काम करते.