ऋतुंचा राजा! वसंत ऋतुत आरोग्य कसे जपावे? काय खावे आणि काय टाळावे?

Spring Season Diet For Health in Marathi: माघ महिन्याच्या शुल्क पंचमीपासून वसंत ऋतु सुरू होतो. फाल्गुन आणि चैत्र महिने वसंत ऋतुत येतात. म्हणजेच फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यात वसंत ऋतु असतो. वसंत ऋतुला ऋतुराज असंही म्हणतात. यावेळी आरोग्याची काळजी घेण्यासही सांगितले जाते. 

| Feb 09, 2024, 13:04 PM IST

1/8

ऋतुंचा राजा! वसंत ऋतुत आरोग्य कसे जपावे? काय खावे आणि काय टाळावे?

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

 वसंत ऋतुला ऋतुंचा राजा असंही म्हटलं जातं. कारण या दिवसात झाडांना नवी पालवी फुटते, फुलांना बहर येतो, आंब्याला मोहोर येतो, हिवाळा ओसरतो व बाहेर हवामान देखील छान होते. पण ऋतुबदलानुसार आपल्या शरीरातदेखील बदल होत असतात. त्यामुळं या दिवसांत आहाराची खास काळजी घेण्याची गरज असते. 

2/8

आहार

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

वसंत ऋतुत फळ आणि भाज्यांचा समावेश खरा. मौसमी भाज्या आणि फळे खा. पालक, गाजर, सरसो का साग, हरभरा, कोबी, फ्लॉवर, मटार सारख्या भाज्यांचा आहारात समावेश करा. 

3/8

रोज 1-2 फळे

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

वसंत ऋतुत सफरचंद, द्राक्षे, केळ, डाळिंब, पपई, बोर यासारख्या फळांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. तसंच, पेरू, स्ट्रोबेरी आणि द्राक्षेदेखील खावे. रोज 1-2 फळे तरी नक्की खा

4/8

चंदनाच्या तेलाने मसाज करा

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

या हंगामात तुम्ही चंदनाच्या तेलाने मॉलिश करा. चंदनाच्या तेलाने पायाला मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो. या तेलामुळं थकवा दूर होतो व फ्रेश वाटते 

5/8

नियमित व्यायाम करा

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

शरीर फिट राहण्यासाठी रोज व्यायाम करा. व्यायाम करण्यासाठी वसंत ऋतु परफेक्ट आहे. या दिवसांत रोज सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास तरी व्यायाम करा. 

6/8

मधाचे सेवन करा

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

मधाचे आयुर्वेदात खूप फायदे सांगितले आहेत. लठ्ठपणा, सर्दी-खोकला किंवा घशात खवखव यासारख्या तक्रारी असतील तर मधाचे सेवन करा. या मौसमात सर्दी-खोकला होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी वसंत ऋतुत कमीत कमी 2-3 दिवस मधाचा वापर करा. 

7/8

या चुका अजिबात करु नका

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

- जास्त तळलेले पदार्थ खावू नका - आंबट आणि गोड पदार्थ एकत्र खावू नका - कोमट पाण्याने आंघोळ करा - मद्यपान अजिबात करु नका - पुरेशी झोप घ्या - जास्त तेलकट अन्न खावू नका

8/8

Disclaimer

vasant ritu and health Diet and Lifestyle Regimen in marathi

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)