केस कापण्यासाठी योग्य दिवस कोणता? जाणून घ्या...

hair cut : तुम्हाला कधी केस कापताना तुमच्या घरच्यांनी अमूक वेळी किंवा अमूक दिवशी केस कापू नका असं कधीतरी सांगितलं असेल. यामागे त्यांच्या काही श्रद्धा अंधश्रद्धा असतात. पण ज्योतिष शास्त्रानुसार केस कापल्याने तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.

Feb 27, 2023, 19:53 PM IST
1/6

 Astrology

ज्योतिष शास्त्रामध्ये केस कापण्यासाठी चांगली वेळ सांगण्यात आली आहे. केस कापताना शरीरातील कचरा किंवा नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्यामुळे केस कापताना खूप काळजी घ्यायला हवी आणि योग्य वेळ पाळायला हवी.

2/6

Position of the Moon

ज्योतिषशास्त्रानुसार केस कापायला जाताना चंद्राची स्थिती पाहायला हवी. चंद्राचे स्थिती आणि केसांच्या संबंधांचा दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतर केस कापण्यासाठी सर्वोत्तम वेळ पौर्णिमेची आहे.

3/6

Faster hair growth

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्याला केसांची जलद वाढ हवी असेल तर त्यांनी पौर्णिमेला शेवटचे सात दिवस असताना केस कापले पाहिजेत

4/6

new moon

तर अमावस्या, 9वा, 15वा आणि 23 हे दिवस केस कापण्यासाठी योग्य मानला जात नाही.

5/6

eclipse

तसेच ग्रहणाच्या सर्व दिवस केस कापणे टाळावे. यासह, हे देखील सुचवले आहे की आपण आपली एकूण कुंडलीचे वाचन करावे  आणि त्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नये.

6/6

hair cut reuters

दरम्यान, येथे दिलेली माहिती सामान्य  माहितीवर आधारित आहे. ZEE 24 Tass याची पुष्टी करत नाही (फोटो सौजन्य - reuters)