मराठवाडा भूकंप: सकाळच्या भूकंपाने भिंतींना तडे, स्थानिकांमध्ये पसरलेल्या दहशतीचे 7 Photos

नांदेड, हिंगोली, परभणी, जालना भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. या तीन जिल्ह्यांत गुरुवारी सकाळी सौम्य भूकंपाचे हादरे बसले आहे. सकाळी सहा ते सव्वा सहाच्या सुमारासच ही घटना घडली आहे. 

| Mar 21, 2024, 12:12 PM IST

Earthquake In Marathwada: नांदेड, हिंगोली, परभणी, जालना भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. या तीन जिल्ह्यांत गुरुवारी सकाळी सौम्य भूकंपाचे हादरे बसले आहे. सकाळी सहा ते सव्वा सहाच्या सुमारासच ही घटना घडली आहे. 

1/7

मराठवाडा भूकंप: सकाळच्या भूकंपाने भिंतींना तडे, स्थानिकांमध्ये पसरलेल्या दहशतीचे 7 Photos

photos Earthquake tremors in Nanded Parbhani Hingoli today

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे. 

2/7

जमिन हादरली

photos Earthquake tremors in Nanded Parbhani Hingoli today

सकाळी सहा वाजून दहा मिनिटांला भूकंपाचे सौम्य धक्के बसले. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना काय घडलं हे समजायच्या आतच जमिन हादरली. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

3/7

दहा मिनिटांत दोन भूकंपाचे धक्के

photos Earthquake tremors in Nanded Parbhani Hingoli today

दहा मिनिटांत दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात आणेक तालुक्यात नागरिकांना भूकंपाचा अनुभव झाला. हदगाव, अर्धापूर , भोकर , नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्के जाणवले.

4/7

भूकंपाची तीव्रता

photos Earthquake tremors in Nanded Parbhani Hingoli today

भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिह्यातील आखाडा बाळापूर पासुन 15 किलो मीटरवर होता. पहिल्या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.6 रिष्टर स्केल असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

5/7

घरांना भेगा

photos Earthquake tremors in Nanded Parbhani Hingoli today

भूकंपामुळं कुठेही जिवितहानी झाली नसली तरी काही जिल्ह्यात घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांना भेगा पडल्या आहेत. तर, कुठे घरांची कौल पडली आहेत. मोडकळीस आलेल्या घरांचा वरचा भाग कोसळून खाली पडला आहे. 

6/7

नागरिक घराबाहेर

photos Earthquake tremors in Nanded Parbhani Hingoli today

हिंगोली तालुक्यातील दांडेगाव परिसरात एक भिंत कोसळल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळं नागरिक घाबरून घराबाहेर पडले. 

7/7

भूगर्भातून आवाज

photos Earthquake tremors in Nanded Parbhani Hingoli today

हिंगोलीत गेल्या पाच वर्षांपासून कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्का जाणवत होते. तर, अनेकदा कळमनुरी वसमत तालुक्यातील काही गावात भूगर्भातून आवाज येत असल्याचंही नागरिकांचे म्हणणे आहे.