200 कोटींचा आहे शाहरुखचा मन्नत बंगला, आतून कसा दिसतो पाहिलाय का?

Shahrukh Khan Mannat Bunglaow: शाहरुख खान (Shahrukh Khan) हा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख खानचे फक्त भारत नाही तर जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणाऱा शाहरुख आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत असून, हे चाहते हजारोंच्या संख्येने त्याच्या घराबाहेर गर्दी करत असतात. शाहरुख खानचा बंगला 'मन्नत'ही (Mannat Bunglaow) त्याच्याइतकाच प्रसिद्ध आहे. या बंगल्यात शाहरुख गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे.   

Mar 06, 2023, 21:12 PM IST
1/8

शाहरुख खानचा मन्नत बंगला 27 हजार स्क्वेअर फुटांमध्ये बांधण्यात आला आहे. आधी याचं नाव विला विएना असं होतं. नरीमन दुबाश यांच्याकडे याची मालकी होती.   

2/8

शाहरुख खानने 'येस बॉस' चित्रपटासाठी या बंगल्यासमोर शुटिंग केली होती. तेव्हाच शाहरुखला हा बंगला आवडला होता. यानंतर त्याने तो खरेदी करण्याचं ठरवलं होतं.   

3/8

शाहरुख खानने 2001 मध्ये बाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून 13.32 कोटींना हा बंगला खरेदी केला होता. यानंतर त्याने बंगल्याचं नाव 'जन्नत' ठेवलं होतं. नंतर हे नाव बदलून 'मन्नत' ठेवण्यात आलं.  

4/8

सलमान खानने आपल्या हा बंगला ऑफर करण्यात आल्याचा दावा केला होता. पण वडिलांच्या सांगण्यावरुन आपण ही ऑफर नाकारली असं त्याचं म्हणणं होतं. इतक्या मोठ्या बंगल्याचं काय करणार असं सलमानच्या वडिलांचं म्हणणं होतं.   

5/8

मन्नात हा 1920 मध्ये बांधण्यात आलेला ग्रेड 3 हॅरिटेज व्हिला आहे. यामध्ये व्हिंटेज आणि मॉडर्न स्टाइल मिश्रीत आहे. सहा मजल्यांच्या या बंगल्यात पाच रुम, जीम, स्विमिंग पूल, लायब्रेरी आणि प्रायव्हेट मुव्ही थिएटर आहे.   

6/8

या बंगल्याचं इंटिरिअर करण्यासाठी तब्बल एक दशक लागलं होतं. गौरी खानने Kaif Faqui नावाच्या आर्किटेक्ट आणि डिझायनरसोबत मिळून हे इंटिरिअर केलं होतं. यावेळी कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती.   

7/8

मन्नतमध्ये शाहरुख खानचं कार्यालयही आहे. येथेच शाहरुख खान सगळ्या मीटिंग घेतो. तसंच बंगल्यात एक अवॉर्ड रुमही आहे. शाहरुख आपल्याला मिळालेले सर्व अवॉर्ड या रुममध्ये ठेवतो. याशिवाय आपल्या बंगल्यात रडण्यासाठी एक बाथरुम असल्याचंही शाहरुखने सांगितलं होतं. आपण जेव्हा कधी त्रस्त असतो तेव्हा त्या बाथरुममध्ये जाऊन रडतो असं त्याने सांगितलं होतं.   

8/8

2016 मध्ये आर्किटेक्ट राजीव पाऱेखने मन्नतला रिनोव्हेट केलं. आज मन्नतची किंमत 200 कोटी आहे. याशिवाय मन्नतच्या बाहेर डायमंड्सने सजवलेली नेमप्लेट लावण्यात आली आहे. याची किंमत 25 लाख रुपये आहे. याशिवाय शाहरुखचं दिल्ली, लंडन, दुबईतही घर आहे.