सिंहाच्या पिल्लासोबत विवाहाचं फोटोशूट करताना हा निर्दयीपणा का?

Mar 15, 2021, 15:12 PM IST
1/6

पाकिस्तानातून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका जोडप्याने त्यांच्या लग्न सोहळ्यात चक्क सिंहाच्या बाळासोबत फोटोशूट केलं. सध्या हे फोटोशूट चर्चेत आलं आहे. जेव्हा या जोडप्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले, तेव्हा नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. शिवाय त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.   

2/6

हे फोटो प्रथम अफजल स्टूडीओने शेअर केले आहेत. हा फोटो स्टुडीओ लाहौरमध्ये स्थित आहे. फोटो शेअर करत त्यांनी 'शेर की राणी' असं कॅप्शन दिलं आहे. ज्यामुळे लोकांना समजलं आहे, की हे सिंहाचं बाळ आहे.   

3/6

फोटोशूटसाठी सिंहाच्या बाळाला ड्रग्स दिल्याचा दावा केला जात आहे. सध्या ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

4/6

यावर फोटोग्राफरने स्पष्टीकरण दिलं आहे. फोटोमध्ये जे सिंहाचं बाळ दिसत आहे. ते जोडप्याचं नाही. एका व्यक्तीकडे सिंहाचं बाळ आहे. म्हणून आम्ही फोटोशूटसाठी त्याला आणलं होते. शिवाय आम्ही त्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान  पोहोचवलं नाही.   

5/6

सिंहाच्या पिल्लासोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ  पोस्ट केल्यानंतर  ट्रेंड होत आहे. शिवाय आता संबंधीत जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

6/6

वन्यजीव किंवा पक्ष्यांना लग्नांमध्ये घेवून जाणं योग्य आहे. पण त्यांचा उपयोग करणं चूकीचं आहे. असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.