Pink Mumbai : हे फोटो टोकियो नाही तर आपल्या मुंबईचे; गुलाबी बहर पाहून तुम्हीही प्रेमात पडाल
या झाडांचे नाव ‘बसंत रानी’ असे आहे. विक्रोळीत रस्त्याच्या दुतर्फा 100 हून अधिक झाडं आहेत. सगळीकडे गुलाबी फुलांचं सौंदर्य पसरलं आहे. या फुलांना सुगंध नसतो पण फुलं बहरल्यानंतर अतिशय सुंदर दिसत आहेत.
Pink Blossom Trees In Mumbai : मुंबईत सध्या परदेशात फिल येत आहे. मुंबईतील काही फोटो पाहून थेट टोकियोची आठवण येत आहे. मुंबईच्या विक्रोळी परिसरात गुलाबी बहर पहायला मिळत आहे. विक्रोळी (Vikroli) हायवेलगत असेलेल्या झाडांवर गुलाबी फुले बहरली आहेत. मुंबईकर सध्या या गुलाबी बहरच्या प्रेमात पडले आहेत (pink blossom trees in Mumba).