Photo Of the Day : पीएम मोदी आणि डेन्मार्कच्या पीएम मेटे फ्रेडरिक्सन यांची केमेस्ट्री चर्चेत

May 03, 2022, 21:32 PM IST
1/6

या दोन बलाढ्य पंतप्रधानांच्या भेटीचे चित्र भारतातच नाही तर डॅनिश मीडियातही प्रसिद्ध झाले आहे. तिथल्या एका प्रसिद्ध वृत्तपत्राने या दोघांच्या भेटीचे फोटो पहिल्या पानावर दिले आहेत.

2/6

पंतप्रधान मोदी डेन्मार्कला पोहोचताच डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मेटे यांनी पंतप्रधान मोदींचे भारतीय शैलीत हात जोडून स्वागत केले. (फोटो क्रेडिट्स: ANI)

3/6

पीएम मोदी आणि मेट फ्रेडरिकसन यांनी दोन्ही देशांच्या विकासावर चर्चा केली. पीएम मोदी म्हणाले, 'तुमच्या सुंदर देशाची ही माझी पहिलीच भेट आहे आणि ऑक्टोबरमध्ये मला तुमचे स्वागत करण्याची संधी मिळाली. या दोन्ही भेटींमुळे आमच्या नात्यात घनिष्ठता आली आहे. (फोटो क्रेडिट्स: ANI)

4/6

पीएम मोदी म्हणाले, 'आम्ही युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम आणि समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि रणनीतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.' त्याचवेळी मेटे यांनी रशियाचाही निषेध करत युद्धबंदीची भाषा केली. (फोटो क्रेडिट्स: ANI)

5/6

दोन्ही पंतप्रधानांमधील चर्चेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची केमेस्ट्री सोशल मीडियावर चर्चेत आहेत. डेन्मार्कला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोपेनहेगनमध्ये डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्या निवासस्थानी भेट दिली.  

6/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पीएम मेटे फ्रेडरिक्सनने डेन्मार्कच्या कोपेनहेगनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली. पीएम मोदी यांनी तेथील गार्डन आणि इंटीरिअरची माहिती घेतली.