...अन् नरेंद्र मोदी Rohit Sharma, Virat Kohli च्या शेजारी जाऊन उभे राहिले! Photo ची एकच चर्चा

PM Modi Rohit Sharma Virat Kohli Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही कृती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं, मोदी कोणत्या रांगेत आणि नेमके कशासाठी ते उभे राहिले होते जाणून घेऊयात...

Mar 09, 2023, 16:29 PM IST
1/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

Modi- Albanese Present for Ind vs Aus Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्याला आज अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्या उपस्थित सुरु झाला.

2/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या माध्यमातून 'सलाम दोस्ती' उपक्रमाअंतर्गत मोदी आणि अल्बनीज यांनी या सामन्याला उपस्थिती लावली.

3/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

मोदींनी अल्बनीज यांचं अगदी प्रेमाने स्वागत केलं. या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

मोदी आणि अल्बनीज यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

5/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

मोदी आणि अल्बनीज यांनी एका छोट्या कारमधून मैदानाला फेरी मारुन सर्व प्रेक्षकांना अभिवादन केलं.  

6/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

सामन्याच्या आधी दोन्ही पंतप्रधानांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांची भेट घेतली. भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे.

7/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

मोदींनी रोहित शर्माला सामन्याआधी टोपी दिली तर अल्बनीज यांनी ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला टोपी दिली.

8/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

मोदींनी मैदानावर जाऊन भारतीय संघातील सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केलं.

9/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवशी मोदींनी हस्तांदोलन केलं तो क्षण.

10/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाशी मोदींनी हॅण्डशेक केला तो क्षण.

11/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

मोदींनी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशीही हस्तांदोलन केलं.  

12/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

पंतप्रधान मोदी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मैदानावरच खेळाडूंबरोबर रांगेत उभे राहिले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बाजूला मोदी उभे असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

13/13

Modi Anthony Albanese In Ahmedabad Stadium

मोदी खेळाडूंबरोबर मैदानात उभे राहून राष्ट्रगीत म्हणत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.