Independence Day 2021 | सलग आठव्या वर्षी मोदींच्या फेट्याची शान कायम...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहात साजरा
आज स्वातंत्र्यदिन... स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज आपण साजरा करतोय. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो अनाम स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस... देशाला नवी देणारं, स्वातंत्र्य, समता एकतेचं महत्त्व सिद्ध करणारा आजचा हा स्वातंत्र्यदिन देश साजरा करत आहे. सगल आठ वर्ष स्वातंत्र्यदिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा यासाठीही चर्चेत असणाऱ्या मोदींनी खऱ्या अर्थाने फेट्याची त्यांची ही परंपरा यंदाच्या वर्षीही कायम ठेवली.