मोदींनी चारा खाऊ घातलेल्या ठेंगण्या गायींची किंमत पाहून बसेल धक्का; दूध फारच गुणकारी कारण...

PM Modi Feeding Small Heighted Cows Know About The Breed: पंतप्रधानांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरुन नरेंद्र मोदींचे कमी उंचीच्या गायींबरोबरचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या कमी उंचीच्या गोंडस गायी पाहून या नेमक्या कोणत्या प्रजातीच्या आहेत असा प्रस्न अनेकांना पडला आहे. पण खरंच या गायी कोणत्या आहेत? त्यांची किंमत किती आहे? त्यांच्या दुधाला इतकं महत्त्व का आहे जाणून घेऊयात...

Jan 16, 2024, 15:16 PM IST
1/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी काही गायांना चारा खाऊ घातला. पंतप्रधानांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते अगदी छोट्या उंचीच्या गायांना चारा खाऊ घालताना दिसत आहे.

2/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी ज्या गायींना चारा खाऊ घातला त्या 'पुंगनूर' प्रजातीच्या आहेत. गायांची ही प्रजाती आंध्र प्रदेशमध्ये आढळून येते.

3/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

पहिल्यांदा या गायांची उत्पत्ती दक्षिण भारतामधील पुंगनूर प्रांतात झाल्याचं मानलं जातं. त्यामुळेच त्यांना हे नाव पडलं आहे. जगातील सर्वात कमी उंचीच्या गायी म्हणून या प्रसिद्ध आहेत.  

4/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार पुंगनूर गाईंच्या दुधामध्ये सोन्याचा अंश असतो. इथे सोनं धातू म्हणून अपेक्षित नसून रासायनिक तत्त्व अशा अर्थाने आहे. आजही आंध्र प्रदेशामधील अनेक मंदिरांमध्ये पुंगनूर गायींच्या दुधाचा अभिषेक घातला जातो.

5/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

तिरुपती मंदिराच्या क्षीराभिषेकामध्येही या पुंगनूर गायीच्या दुधाचा वापर केला जातो. या दिव्य स्वरुपातील गायी असल्याचं मानलं जातं. या गायी फार हिंसक नसतात. त्या लवकर माणसाळतात.

6/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

पुंगनूर गायीचं दूध फारच पौष्टीक मानलं जातं. या दुधामध्ये फॅट्सचं प्रमाणे अधिक असतं. जवळपास 8 टक्के फॅट या गायीच्या दुधात असतं. इतर गायींच्या दुधात हेच प्रमाण 3 ते 4 टक्के इतकं आहे.

7/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

मोदी चारा खाऊ घालत असलेल्या पुंगनूर गायीच्या दुधामध्ये ओमेगा फॅटी अॅसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मँगनीजचं प्रमाण अधिक असतं.

8/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

पुंगनूर गायीच्या दुधाचा वापर औषधी गुणधर्मांसाठी केला जातो. या प्रजातीची गाय दिवसाला 1 ते 3 लीटर दूध देते. एक गाय जवळपास 5 किलो चारा फस्त करते.  

9/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

पुंगनूर प्रजातीच्या एका गायीची किंमत एका लाखांपासून 5 लाखांपर्यंत असते. गाय जितकी उंचीला कमी तितकी ती महाग अशा हिशोब असतो.

10/10

PM Modi Feeding Small Heighted Punganur Cows Know About The Breed

पंतप्रधान मोदींचे या पुंगनूर गायींबरोबरचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या गायी त्यांना चारा खाऊ घालणाऱ्या व्यक्ती इतक्याच खास आहेत असेच वरील माहिती वाचल्यावर म्हणता येईल.