Pragyan Rover Update: स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी रोव्हरने चंद्रावर काय शोधलं? जाणून घ्या
Pragyan Rover: स्लीपिंग मोडवर जाण्यापूर्वी आपल्या चांद्रयान-3 ने अनेक महत्त्वाची आणि विशेष माहिती पाठवली आहे. ज्यामध्ये चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरमध्ये बसवण्यात आलेल्या शुद्ध पेलोडने चंद्राच्या तापमानाशी संबंधित पहिले निरीक्षण पाठवले.
Pragyan Rover: विक्रमने ज्या कामासाठी त्याला चंद्रावर पाठवले होते ते काम आता पूर्ण केले आहे. आता तो त्याच चंद्राच्या कुशीत आरामात झोपला आहे. खुद्द इस्रोने याबद्दल माहिती दिली. प्रज्ञान रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे. ते आता सुरक्षितपणे पार्क केले आहे आणि स्लीप मोडवर असल्याचे इस्रोने मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर लिहिले आहे.