PHOTO : 'गजर झाला दारी, साजनाची स्वारी...'; प्रथमेश परब आणि क्षितीजाच्या हळदीची एक झलक पाहाच

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे सुरु झाले आहेत. नुकतीच रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगानीनी लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या मागोमाग आता एका नव्या जोडप्याची चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची 'पराजू' क्षितिजा घोसाळकरची. त्यांच्या हळदीचा कार्यक्रम झाला असून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 

| Feb 23, 2024, 12:28 PM IST
1/7

प्रथमेश परब

प्रथमेश परबनं व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा केला होता. 

2/7

प्रथमेश आणि क्षितिजाची हळद

प्रथमेश आणि क्षितिजाच्या हळदीचा कार्यक्रम झाला त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

3/7

प्रथमेशचा लूक आणि कॅप्शन

प्रथमेशनं परंपरेनुसार पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. तर फोटो शेअर करत प्रथमेश म्हणाला, तिनं सगळ्यांचं लक्ष वेधण्याआधी माझा हळदीचा ग्लो. 

4/7

क्षितिजाचा लूक आणि कॅप्शन

क्षितिजानं पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यासोबत फुलांपासून बनवण्यात आलेले दागिने देखील तिनं परिधान केले आहेत. तर तिनं कॅप्शन दिलं की 'गजर झाला दारी, साजनाची स्वारी, साजनाची स्वारी आली लाज गाली आली.'

5/7

कोण आहे क्षितिजा?

क्षितिजा ही एक अभिनेत्री आहे. त्याशिवाय ती मॉडेलिंग देखील करते आणि ती एक उत्तम लेखिका देखील आहे. 

6/7

‘टाईमपास’ च्या सेटवर पहिली भेट

बराचकाळ सोशल मीडियावर एकमेकांशी बोलत असले तरी त्या दोघांची पहिली भेट ही ‘टाईमपास’ च्या सेटवर झाली होती.   

7/7

पहिल्याच भेटीत क्षितिजानं विचारला प्रश्न?

पहिल्याच भेटीत क्षितिजानं प्रथमेशला प्रश्न विचारला की 'आपण रिलेशनशिपमध्ये येऊया का?' क्षितिजा आधीपासून आवडत असल्यानं प्रथमेशनं लगेच होकार दिला आणि त्यांच्या प्रवास सुरु झाला. (All Photo Credit : Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Instagram)