मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला
Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.
Premier Padmini taxis: सोमवारपासून मुंबईत रस्त्यावर धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी बंद होणार आहे. गेली 60 वर्षे मुंबईच्या रस्त्यावर ही काळी पिवळी धावत होती. प्रीमिअर पद्मिनी कंपनी बंद झाली असून आता मात्र सोमवार पासून ह्या टॅक्सीचे मीटर डाऊन होणार आहे. पद्मिनी टॅक्सित ऐसपैस जागा ,स्टेअरिंगला गियर, समोरून आणि मागून सुरक्षित असलेली ही टॅक्सी बंद होत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतसुद्धा या टॅक्सीने मानाचे स्थान मिळवले होते.