अयोध्या नगरी झळाळली

शहरातील मंदिरे आणि घरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. 

Aug 01, 2020, 14:37 PM IST

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत सध्या लगबग सुरु आहे.या सोहळ्याच्यानिमित्ताने अयोध्या नगरीने अक्षरश: कात टाकली आहे. शहरातील मंदिरे आणि घरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्या नगरी झळाळून निघाली आहे.

1/12

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ४ आणि ५ ऑगस्टला अयोध्येतील सर्व मंदिरे उघडली जाणार आहेत. या दोन दिवसांत अयोध्येत दिवाळीसारखा उत्साह असेल.  

2/12

अयोध्येतील सर्व मंदिरांची व्यवस्थितपणे साफसफाई करुन ४ आणि ५ ऑगस्टला प्रत्येक ठिकाणी दिव्यांची आरास करण्याचे आदेश दिले आहेत.   

3/12

५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराच्या भूमिपूजनचा सोहळा संपन्न होणार आहे  

4/12

आता अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे.  

5/12

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला मोजक्या लोकांनाच आमंत्रित केले जाणार आहे.  

6/12

५ ऑगस्टला सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल होतील.   

7/12

यानंतर भूमिपूजनाच्या सर्व विधींना सुरुवात होईल.

8/12

9/12

10/12

11/12

12/12