#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

May 21, 2019, 15:33 PM IST
1/6

#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

loksabha election 2019 लोकसभा निवडणुकांची संपूर्ण देशात धामधूम सुरु असतानाच अवघ्या काही तासांवर देशाची सत्ता नेमकी कोणत्या पक्षाकडे जाणार यावरुनही पडदा उचलला जाणार आहे. निवडणूक निकालांच्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर केदारनाथ आणि बद्रीनाथ या धार्मिक स्थळांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेथील विकास कामांची पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा करुन मोदींनी देवदर्शनही  केलं. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या या दौऱ्याचे फोटो पोस्ट केले. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)

2/6

#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

केदारनाथ धाम येथे गेलेल्या मोदींनी एका गुहेत ध्यानधारणाही केली. त्यांचे हेच फोटो पाहता राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली. पण असाही एक वर्ग आहे, ज्या वर्गातील असंख्य जणांसाठी मोदींचे हेच फोटो #TravelGoals देणारे ठरत आहेत. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)

3/6

#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

बर्फाच्छादित डोंगर आणि त्या निसर्गसौंदर्यात वावरणारे मोदी हे एकंदर फोटो पाहता सोशल मीडियावर त्यांच्या या दौऱ्याने फिरस्तीवर जाणाऱ्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)

4/6

#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

पंतप्रधान मोदी आणि उत्तुंग हिमालय पर्वत यांचं नातं तसं खास. याच नात्याची अनुभूती त्यांचे फोटो पाहतानाही येते. बर्फाच्छादित हिमालयाच्या कुशीत मोदी ध्यानधारणा करत असल्याचं पाहून ती शांतता अनेकांनाच हवीहवीशी वाटत आहे. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)

5/6

#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

बद्रीनाथाच्या दर्शनासाठी  गेलेल्या मोदींनाची तेथील पूजेत सहभागी होता आलं याचं समाधान असल्याचं त्यांचा फोटो आणि त्याचे कॅप्शन पाहून लक्षात येत आहे. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)

6/6

#TravelGoals देत आहेत पंतप्रधान मोदींचे 'हे' फोटो

हिमाचल प्रदेश, केदारनाथ आणि बद्रीनाथ येथील निसर्गाने खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनाही भुरळ पाडली हे खरं. त्यामुळेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यापासून खुद्द पंतप्रधानही स्वत:ला रोखू शकलेले नाहीत. त्यामुळे राजकारणापेक्षा त्यांचे हे फोटो प्रवासवेड्या मंडळींसाठी खऱ्या अर्थाने #TravelGoals देत आहेत हे खरं. (छाया सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी / इन्स्टाग्राम)